ओबीसींच्या (OBC) नावानं चुकीचं बोलता, मग संसदीय पद्धतीनं कारवाई झाल्यावर बीजेपीच्या नावानं का बोंबलता?
Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) मानहानीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयानं गुरुवारी (23 मार्च) राहुल गांधींना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली.
त्यानंतर काल (शुक्रवार, 24 मार्च) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला.
राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापलंय. याप्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. राहुल गांधींना भारताबाहेर काढून पाकिस्तानला पाठवून द्या, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
ओबीसींच्या (OBC) नावानं चुकीचं बोलता, मग संसदीय पद्धतीनं कारवाई झाल्यावर बीजेपीच्या नावानं का बोंबलता? परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींवर कसाबप्रमाणं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना पाकिस्तानात पाठवा, असंही राणे म्हणाले.
नितेश राणेंनी सांगलीसह महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू असल्याचा दावा केला. अनधिकृत धार्मिक स्थळ उभी करायची, डुक्कर कापायची. जेणेकरुन हिंदू तिथून निघून जातील, असा प्रकार राज्यात सुरू आहे. लव्ह जिहाद (Love Jihad) विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना देखील याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्यान आणि प्रबोधनातून प्रयत्न केला जात आहे. मुंब्राचा जित्तूदिन आणि अबू आझमी लव्ह जिहादची आकडेवारी खोटे असल्याचा दावा करत असल्याचा आरोपही राणेंनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.