maharashtra-vidhansabha sakal
महाराष्ट्र बातम्या

विधानसभेसाठी २० ऑगस्टला प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी! घरी बसून ‘येथे’ करा नोंदणी; 25 जून ते 24 जुलैपर्यंत घरोघरी सर्व्हेक्षण; लोकसभेला ‘मृत’ म्हणून चुकीची नोंद

तात्या लांडगे

सोलापूर : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २५ जून ते २४ जुलैपर्यंत बीएलओ घरोघरी जावून नवीन मतदार नोंदणी, मृत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करणार आहेत. २५ जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर ९ ऑगस्टपर्यंत मतदारांना विधानसभा निवडणुकीसाठी नाव नोंदणी करता येईल. २० ऑगस्टला विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. ज्या मतदारांकडे मतदान कार्ड असूनही लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही, ज्यांनी मतदार यादीत नावच नोंदविलेले नाही, ज्यांना पत्ता, नाव यामध्ये दुरुस्ती करायचा आहे, त्यांना ९ ऑगस्टपर्यंत तो बदल करता येणार आहे. तसेच ज्यांना १ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्या नवयुवकांनाही मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी वर्षातून एकदाच जानेवारीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांना अशी संधी होती, पण आता निवडणूक आयोगाने ही सुविधा १ जानेवारी, १ एप्रिल, १ जून व १ ऑक्टोबर अशा चार टप्प्यात उपलब्ध करून दिली आहे.

‘या’ संकेतस्थळावर मतदार नोंदणी, नावात दुरूस्ती

मतदार म्हणून ऑनलाइन नाव नोंदविण्याची कार्यपद्धती अगदी सोपी असून त्यासाठी केवळ जन्माचा पुरावा व रहिवासी पुरावा लागतो. विवाहानंतर पत्नीचे नाव नोंदविण्यासाठी सासरचे नाव लागल्याचा पुरावा किंवा विवाह प्रमाणपत्र (ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेकडील दाखला) अपलोड केल्यास पत्नीचेही नाव मतदार यादीत दुरुस्तीसह समाविष्ठ होईल. मतदारयादीत नाव नोंदणी voter helpline किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळावर करता येईल.

लोकसभेला ‘मृत’ म्हणून चुकीची नोंद

लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी, मृत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची विशेष मोहीम घेण्यात आली होती. त्यावेळी कुटुंबातील मृताची माहिती घेत असताना ज्यांनी माहिती दिली किंवा ज्यांची माहिती भरली त्यांचीच अनावधानाने मृत म्हणून नोंद लागल्याचे आता उघड झाले आहे. त्या मतदारांनाही आता नव्याने अर्ज करून मतदार यादीत समाविष्ठ करून घेण्यात येत आहे.

नवमतदारांनी मतदार नोंदणी करून घ्यावी

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २५ जून ते २४ जुलैपर्यंत बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी सर्व्हे होणार आहे. त्यात नवीन नोंदणी, नावातील दुरूस्ती, दुबार नावे व मयत नावे वगळण्याची कार्यवाही होईल. २० ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. १ जुलै २०२४ पर्यंत ज्यांना १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांनाही मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आहे.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT