finance minister sitharamans stay at mla tapkeers house and curd rice meal BJP Preparations For Baramati  esakal
महाराष्ट्र बातम्या

Nirmala sitharaman: दही-भाताचे जेवण करुन निर्मला सीतारमण बारामती मोहिमेवर

भाजपकडून राष्ट्रवादीचा बालेकिल्या असलेल्या बारामतीत जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजपकडून राष्ट्रवादीचा बालेकिल्या असलेल्या बारामतीत जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढील 3 दिवस बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापूर्वी, सीतारमण यांनी त्यांचा मुक्काम खडवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या धनकवडीतील घरी केला. यावेळी त्यांनी रात्रीच्या जेवणात पोळी-भाजी आणि दही-भाताचा अस्वाद घातला. (finance minister sitharamans stay at mla tapkeers house and curd rice meal BJP Preparations For Baramati )

तीन दिवसांच्या दौऱ्यातील तीनही दिवस हॉटेलमध्ये न राहता सितारमण कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर त्या बारामती मोहिमेवर निघणार आहेत. मुक्कामाच्या पहिल्या दिवशी रात्रीच्या जेवणात सीतारामण यांनी आवडीचा दही भात, चपाती व भेंडीची भाजी, बटाट्याचा रस्सा भाजी असा आहार घेतला. त्यानंतर, सोलकढी घेतली. अर्थमंत्री सीतारामन या शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांच्या आहारात कांदा लसूण नसतो.

गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्र्यांच्या बारामती दौऱ्याची चर्चा सुरू होती. याआधी भाजपचे याआधी भााजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी गेले काही दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा केला असून यावेळी आम्हीच बारामती जिंकणार असा दावा केला आहे. अर्थमंत्री सीतारमण या राष्ट्रीय स्वयसेवक संघाचा संघटनात्मक आढावा घेणार असून मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांचा बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपकडून कसोसीने प्रयत्न केले जात आहेत. भाजपने मिशन बारामतीची सुरुवात केली असून, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.

1996 पासून बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांचे निर्विवाद वर्चस्व आहे. 1984 आणि 1991 ला देखील पवारांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीत मिळालेल्या विजयानंतर आता भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला आहे. यासाठी आमदार राम शिंदेंनी कंबर कसली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT