प्रवीण दरेकर esakal
महाराष्ट्र बातम्या

दरेकरांविरोधात गुन्हा दाखल; CM ऑफिसचा आशीर्वाद असल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

देवेंद्र फडणवीस यांनी कालच सभागृहात प्रवीण दरेकर यांना अडकवलं जाण्याची भीती व्यक्त केली होती.

राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात आम आदमी पार्टीने दरेकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत बोगस मजूर असल्याचे व मुंबई बँक आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आला. या प्रकरणी IPC कलम 199,200,406,417,420,465,468, आणि 120(b) कायद्यांतर्गत प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं की, हे सगळं सूडभावनेनं केलं जात आहे. विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर टीका करत असल्यानं हा गुन्हा दाखल केला जात आहे. याआधी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. सभागृहात याबाबत मी सांगणार आहे. अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला गेला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून एसएमएस पाठवले गेले असा आऱोप दरेकरांनी केला.

दबाव आणून आणि षडयंत्र रचून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचा आवाज दाबण्यासाठी असं केलं जात आहे. अतिरिक्त आयुक्तांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न केले गेले. असं होत नाही हे सांगूनही शेवटी त्यांच्यावर इतका दबाव टाकला गेला की गुन्हा दाखल कऱण्यात आल्याचं दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात बोलताना दरेकरांना अडकवण्यात येईल अशी भीती व्यक्त केली होती. त्यानतंर दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल झाल्यानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत माहिती होती का असा प्रश्न विचारला जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांनी २००० कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आपने केला आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करत काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला असून तो अहवाल आपण देण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे.

दरम्यान, सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याप्रकरणी सतत पाठपुरावा केल्यानंतर आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला असल्याचं आम आदमी पक्षाने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT