FIR Against Nilesh Rane sakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंसोबत भावाच्याही अडचणीत वाढ, सिंधुदुर्गात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंपाठोपाठ (BJP MLA Nitesh Rane) आता निलेश राणेंच्याही (Nilesh Rane) अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhhav Naik) यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यानंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर न्यायालय परिसरात पोलिसांनी नितेश राणेंची गाडी थांबवली. त्यानंतर निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळेच निलेश राणेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत वैभव नाईक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे.

पत्रात काय म्हटलं? -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी असताना देखील निलेश राणे यांनी जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच पोलिसांसोबत अरेरावी केली. शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल निलेश राणेंसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असं वैभव नाईक यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं? -

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं नितेश राणेंचा जामीन फेटाळला. तसेच संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी आधीच फिल्डींग लावली होती. न्यायालयानं जामीन फेटाळताच पोलिसांनी राणेंच्या गाडीला घेराव घातला. पण, तुम्हाला गाडी थांबवण्याचे आदेश कोणी दिले, असा सवाल करत निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले होते. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहात. आधी आदेश दाखवा आणि गाडी थांबवा, असं निलेश राणे म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT