fire in nandurbar rail fire in nandurbar rail
महाराष्ट्र बातम्या

नंदुरबार : गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग

सकाळ डिजिटल टीम

गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना शनिवारी (ता. २९) आग लागली. नंदुरबार (nandurbar) रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आग आणखी वाढत असल्याचे दिसत आहे. भीषण आग लागल्याने प्रवासी चांगलेच भयभीत झाले होते.

गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने ट्रेन निघाली होती. नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर गाडी असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात आग (fire in rail) लागली. आग लागल्याचे समजताच ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशी गाडीतून बाहेर पडले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली.

भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोट पसरल्याने काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. त्यामुळे मोटरमनने एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली (fire in rail) आहे. घटनास्थळी नंदुरबार (nandurbar) अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत.

डब्बे केले वेगळे

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ज्या डब्यांना आग लागली ते डबे इतर डब्यांपासून वेगळे केले (fire in rail) आहेत. या डब्यांना लागलेली आग विझवण्यात येत असून दोन डब्यांत कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT