नागपूर : दृष्टीहीन लोकांसाठी देशातील पहिले रेडिओ केंद्र नागपूरात सुरु करण्यात आलं आहे. दृष्टीहीन लोकांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. दृष्टीहीनांसाठी असलेला देशातील पहिला रेडिओ चॅनेल हा 'रेडिओ अक्ष' या नावाने सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान या नव्याने सुरु करण्यात आलेल्या रेडिओ केंद्रासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आणि सामग्री ह्या दृष्टीहीन व्यक्तींकडून तयार करण्यात येतील असं रेडिओ केंद्राचे समन्वयक आणि समदृष्टी क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळाचे सदस्य शिरिष दारव्हेकर यांनी सांगितलं. तसंच दृष्टीहीन व्यक्तींना त्यांच्या घरून सहज शिकता यावं यासाठी आम्ही ऑडिओबुक देखील विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान हा देशातील दृष्टीहीन लोकांसाठी विकसित केलेले पहिलेच रेडिओ केंद्र असून यामुळे अंध व्यंक्तींच्या विकासासाठी मदत होणार आहे. असं रेडिओ केंद्राच्या समन्वयकांनी सांगितलं.
रेडिओ केंद्रासाठी लागणारे कर्मचारी हे पूर्णपणे प्रशिक्षित असून त्यामध्ये जास्त महिलांचा सामावेश आहे. त्यासाठी लागणारा कंटेंट त्या तयार करणार आहेत. मागच्या काही वर्षापासून आम्ही दृष्टीहीनांसाठी ऑडिओबुक तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत पण कोरोनामुळे ते काम पुढं ढकलण्यात आलं. असं ते ANI ला बोलताना म्हणाले.
रेडिओच्या AM आणि FM साठी काही मर्यादा आहेत. आमच्या या वाहिनीसाठी आम्हाला वेगळा कंटेंट द्यावा लागणार आहे. त्यासाठी आमची २० लोकांची टीम काम केली आहे. आमच्या टीममध्ये जास्त महिला असून त्या हाऊसवाईफ असल्याचं त्यांनी सांगितलं.
तसंच हे चॅनेल Play Store वरही उपलब्ध असणार आहे, तसंच Apple Device वरही आपल्याला या वाहिनीवरील कार्यक्रम ऐकता येऊ शकतात. आम्ही फक्त २ ते ४ दिवसांत १६१ श्रोते तयार केले आहेत असंही ते म्हणाले.
"मी दृष्टीहीन लोकांसाठी काम करत असल्याने मला आनंद होत आहे. कारण आमच्यामुळे ते लोकं घरून सहजपणे काम करु शकतात." असं तिथे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.