student in exam esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांची 17 ते 26 ऑक्टोबरपर्यंत प्रथम सत्र परीक्षा! मुख्याध्यापक संघाची तयारी, यंदा शाळांना 'एवढ्या' दिवस दिवाळी सुट्टी

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्र परीक्षेला कोणताही अडथळा नाही. दिवाळी सुटीपूर्वी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा पार पडणार असून १७ ते २६ ऑक्टोबर या काळात ही परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्याध्यापक संघाने परीक्षेचे वेळापत्रक सर्व शाळांना यापूर्वीच कळविले असून त्यानुसार शाळांची तयारी पूर्ण झाली आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून झाली आहे. शैक्षणिक वर्षातील चार महिने संपल्यानंतर विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षा पार पडणार आहे. मुख्याध्यापक संघाशी संलग्नित शाळांना (सभासद असलेल्या शाळा) मुख्याध्यापक संघातर्फे प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सातवीनंतर विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात घालण्याचा प्रकार थांबविला आहे. त्यामुळे शाळांना आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणेच घ्यावी लागणार आहे. सर्व आस्थापनांच्या शाळांनी त्यादृष्टीने परीक्षेची तयारी केली असून परीक्षांचे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या पालकांनाही पाठविले आहे. २६ ऑक्टोबरला ही सत्र परीक्षा संपणार असून दुसऱ्या दिवशी रविवारी आहे. त्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी लागेल.

निवडणूक कामांमुळे वैतागले शिक्षक

बोर्डाने यंदा दहावी- बारावीच्या परीक्षा १० ते १५ दिवस अगोदर घेण्याचे नियोजन केले आहे. याच वर्षी लोकसभा निवडणूक झाली आणि आता विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. शिक्षकांना नवीन मतदार नोंदणी, दुबार मतदार वगळणे, मयत मतदारांची माहिती संकलित करणे अशा कामांसाठी शिक्षकांना ‘बीएलओ’चीही ड्यूटी करावी लागते. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे पुरेशा प्रमाणात लक्ष देता आले नाही. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानंतरही शिक्षकांना बीएलओची ड्यूटी दिली जात असल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची बीएलओ ड्यूटी रद्द करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने देखील करण्यात आली आहे.

विधानसभेपूर्वी वेळेत सत्र परीक्षा पार पडेल

दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा दिवाळीपूर्वी होईल. १७ ते २६ ऑक्टोबर या काळात ही सत्र परीक्षा होणार असून त्यानंतर दिवाळी सुटी सुरू होईल. विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार असून विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा त्यापूर्वीच पार पडेल.

- तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, सोलापूर

२८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुटी

पहिली सत्र परीक्षा संपल्यानंतर शाळा- महाविद्यालयांना यंदा २८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्या लागणार आहेत. ९ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्या असतील आणि त्यानंतर १० नोव्हेंबरपासून दुसऱ्या सत्राचे कामकाज सुरू होणार आहे. या वर्षी शाळांना २ मे ते १४ जून या काळात उन्हाळा सुट्या असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: देशी गायी 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का, भाजपने फोडली अजित पवारांची राष्ट्रवादी, 'हा' आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश!

IND vs BAN T20I : सूर्याच्या टीमला टक्कर देण्यासाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; स्टार खेळाडूला दीड वर्षानंतर बोलावले

Cabinet Meeting: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; निवृत्तीनंतरच्या निधीमध्ये वाढ अन्...

Sharad Pawar: बालेकिल्ल्यावर पवार मिळवणार पुन्हा विजय? राजन पाटलांनंतर, आमदार बबन शिंदे दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT