महाराष्ट्र बातम्या

Konkan: नारळी पौर्णिमेच्या मध्यरात्री मच्छीमारांची बोट पलटली, तीन जण बुडाले, एकजण थोडक्यात बचावला

सकाळ वृत्तसेवा

Arebian Sea: मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली जनता जनार्दन मच्छिमार नौका आचरा समुद्रात दुर्घटना ग्रस्त झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर एक मच्छिमार पोहत किनारयावर येण्यात यशस्वी ठरल्याने बचावला.

मृतात पातीचे मालक सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे व्हाईसचेअरमन गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर यांचा समावेश आहे. आडकर हे चौके हायस्कुल मधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. तर हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे वय 65 व प्रसाद भरत सुर्वे वय 32 यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

ऐन नारळी पौर्णिमेला झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्जेकोट व हडी गावासह मच्छिमार बांधवांवर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत वय 53 रा मोर्वे देवगड हे पोहत किनऱ्यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला असून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

दरम्यान सकाळच्या सुमारास दुर्घटनेतील मच्छिमारांचे वा्यंगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दोघांचे मृतदेह आढळून आले . दुर्घटना घडल्याचे समजताच आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, आचरा पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, तुकाराम पडवळ, सुदेश तांबे, मिलिंद परब, मनोज पुजारे अमित हळदणकर विशाल वैजल तसेच मच्छिमार समितीचे छोटू सावजी,दिलीप घारे,बाबी जोगी, विकी तोरसकर, डॉ प्रमोद कोळंबकर, वसंत गांवकर, ढोले बाबू तसेच सर्जेकोट, हडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT