Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Guardian Minister: स्वातंत्र्यदिनाचा झेंडा फडकावला पण पालकमंत्रीपदाचा तिढा कायमच, कोल्हापुरातून फिल्डिंग

स्वातंत्र्यदिनापर्यंत पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता

प्रमोद बोडके,

मी तात्पुरता पालकमंत्री आहे, म्हणत म्हणत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सोलापूरची जबाबदारी येऊन २४ सप्टेंबरला एक वर्षे पूर्ण होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार आज ना उद्या होईल, त्यावेळी आपल्या जिल्ह्याला हक्काचा आपल्यातील पालकमंत्री मिळेल, अशी आस सर्वांना होती. तात्पुरत्या पालकमंत्र्यांना बघताबघता एक वर्षे पूर्ण झाले. आढावा बैठक, नियोजन समितीची बैठक या शिवाय पालकमंत्री विखे-पाटील सोलापूरकडे फिरकत नाहीत. मी तात्पुरता म्हणून त्यांनी आजपर्यंत वेळ मारून नेली आहे. राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचा असलेला सोलापूर जिल्हा अक्षरश: वाऱ्यावर सोडला गेल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना जसा विरोधकांचा अनुभव येत होता, तसाच अनुभव आता सत्तेत असूनही त्यांना येत असावा. जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्याचा परिणाम जसा भाजपच्या संघटनेवर झाला आहे, तसाच परिणाम जिल्ह्याच्या प्रशासनावर झालेला आहे. (Latest Marathi News)

जिल्ह्यात तहसीलदार दर्जाचे अधिकारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून बदलीने या जिल्ह्यात येतात; परंतु त्यांना रुजू करून घेतले जात नाही, ही बाब पालकमंत्री-प्रशासन-स्थानिक भाजप व आमदार यांच्यातील विसंवाद स्पष्ट करण्यास पुरेशी मानली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री व त्यांचे सहकारी मंत्री होऊन जवळपास दीड महिना लोटला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती मिळाली आहेत; परंतु पालकमंत्री म्हणून जिल्हा नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांना स्वतंत्र पालकमंत्री नाही, अशी विचित्र स्थिती सध्या राज्यात आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाच्या जिल्हास्तरावरील मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या निमित्ताने पालकमंत्री जाहीर होतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, सरकारने या समारंभासाठी मंत्र्यांना झेंडा फडकविण्यासाठी जिल्ह्यांची जबाबदारी दिली. त्यामुळे मंत्र्यांच्या हस्ते झेंडा फडकावला गेला; परंतु पालकमंत्रिपदाचा तिढा मात्र कायम आहे. पालकमंत्रिपदाचा तिढा कायम राहिल्याने येत्या काळात काही मंत्र्यांना घरी बसवून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन विस्तारानंतर पालकमंत्रिपद वाटपाच्या शक्यतेला बळ मिळू लागले आहे.(Latest Marathi News)

भाजपची ही अगतिकता कशासाठी?

राज्यात सर्वाधिक आमदार असूनही एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे, सरकारमध्ये कमी आमदार असूनही राष्ट्रवादीला सर्वात जास्त आमदार असलेल्या भाजपच्या बरोबरीने उपमुख्यमंत्रिपद यामुळे भाजपची ही अगतिकता नक्की कशासाठी? हे समजण्यास मार्ग नाही. जिल्ह्यात ११ पैकी भाजपचे सहा आमदार असतानाही पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाईल अशी चर्चा (झेंड्याच्या जबाबदारीमुळे) जोर धरू लागली आहे. (Latest Marathi News)

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन व पुरस्कृत एक, असे तीन आमदार आहेत. सोलापूरचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे राहते की भाजपकडे, स्थानिक नेत्याला संधी मिळते की पुन्हा बाहेरचा पालकमंत्री? या मुळे प्रशासनात आणि जिल्ह्याच्या राजकारणात अस्वस्थता दिसत आहे.

कोल्हापुरातून फिल्डिंगचा प्रयत्न

युतीमध्ये सोलापूरचे पालकमंत्रिपद भाजपकडे, तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे राहिले आहे. आता राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी दोघेही सत्तेत आहेत. सोलापूरचे पालकमंत्रिपद सध्या भाजपकडे आहे. ते भाजपकडेच राहणार की हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे जाणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

सोलापूरचे पालकमंत्रिपद भाजपकडे राहिल्यास ही धुरा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील तर राष्ट्रवादीकडे पालकमंत्री गेल्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सोलापूरचे पालकमंत्री होण्याची शक्यता गृहीत धरून सोलापुरातील अधिकारी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच पाटील-मुश्रीफ यांच्याकडे सलगी वाढविण्यास सुरवात केली आहे. पाटील आणि मुश्रीफ हे दोघेही कोल्हापूरचे आहेत. दोघांपैकी एक सोलापूरचे पालकमंत्री होण्याची शक्यता गृहित धरून कोल्हापुरातील कनेक्शन्स कामाला लावल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT