महाराष्ट्र बातम्या

पक्षाध्यक्ष पदासाठी सुळे मात्र सर्वाधिक परिणाम ‘मविआ’वर; साम टीव्हीच्या कौल, राजकीय समीकरण बदलणार

रुपेश नामदास

पुणे, ता. ३ ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचा सर्वाधिक परिणाम महाविकास आघाडीवर होईल, असे ‘सकाळ’ आणि साम टीव्हीने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून समोर आले आहे.

विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजपसोबतच्या संभाव्य आघाडीबद्दल वारंवार इन्कार केला आहे; तथापि, सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपसोबत जुळवून घेतले, तरी महाराष्ट्रात राजकीय स्थिरता येऊ शकेल, असे राजकीय क्षेत्रात वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य पक्षाध्यक्ष पदासाठी सर्वेक्षणातील सर्वाधिक लोकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाजूने कौल दिला आहे.

पवार यांनी २ मे रोजी मुंबईतील कार्यक्रमात आपल्या आगामी वाटचालीची दिशा सांगितली. त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभातच ही घोषणा त्यांनी केली.

उपस्थित कार्यकर्त्यांसह राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना हा मोठा धक्का होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा कल ‘सकाळ’ आणि ‘साम टीव्ही’ने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून जाणून घेण्यात आला. २ आणि ३ मे रोजी हे सर्वेक्षण करण्यात आले.

पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या आणि नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या निर्णयाबद्दल बहुमत सकारात्मक असले, तरी ते एकतर्फी नाही. ४७.५ टक्के लोकांना पवारांचा निर्णय योग्य वाटतो आहे. त्याचवेळी ४५.९ टक्के लोकांना हा निर्णय योग्य वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवगळता अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मते (५६.१ टक्के) निर्णय योग्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT