anil deshmukh esakal
महाराष्ट्र बातम्या

'मला आठवत नाही', चांदीवाल आयोगाच्या उलट तपासणीत देशमुखांनी प्रश्न टाळला?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) कथित खंडणीबाबत केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Commission) नेमली आहे. या समितीसमोर देशमुखांना आज हजर करण्यात आले आहे. यावेळी सचिन वाजे (Sachin Waze) यांच्या वकिलांनी देशमुख यांची चौकशी केली. चांदीवाल समितीची सुनावणी जवळपास पूर्ण झाली असून फेब्रुवारीच्या अखेरीस याबाबतचा चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia bomb scare) आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiran murder case) मुख्य आरोपी असलेला सचिन वाजे यांनी मुंबई पोलिस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना चौकशीसाठी बोलवण्यात यावे, याबाबत केलेल्या अर्जाला संजीव पालांडे यांच्यातर्फे विरोध दर्शवण्यात आला.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची देशमुखांनी दिली उत्तरे

वाजेचे वकिल डाॅ नायर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आपण तपासणीचे आदेश सीआयडीला दिले होते का ?

देशमुख : सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मी आदेश दिले होते. यात चौकशी झाल्याचे कळवले. त्यामुळे पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. पण मी त्या तपासा संदर्भात समाधानी नव्हतो. कारण त्या प्रकरणात व्यवस्थित चौकशी झाली. म्हणून मी पुन्हा चौकशीचे आदेश इतर अधिकाऱ्यांना दिले. मात्र या प्रकरणाचा आणि त्या प्रकरणाचा काहीही संबध नाही.

डाॅ नायर - ते कोण अधिकारी आहेत? ज्या़नी तुम्हाला पुन्हा अन्वय नाईक आत्महत्या चौकशीची गरज नसल्याचे सांगितले.

देशमुख : मला आठवत नाही

डाॅ नायर : असे कुठले कागदपत्र तुम्हाला अन्वय नाईक या़नी दिले. ज्याने करून तुम्ही पून्हा चौकशीचे आदेश दिले

देशमुख : मला आठवत नाही

डाॅ नायर - सप्टेंबर महिन्यात सह पोलिस आयुक्तपदी नियुक्ती ही वाजेंच्या नियुक्ती पूर्वी करण्यात आली

देशमुख - मला आठवत नाही

डाॅ नायर : मिलिद भारंबे सह आयुक्त असताना सीआययू अधिकारी म्हणून वाजेंनी त्यांना रिपोर्ट करायला हवे

देशमुख : नियमानुसार करायला हवं

डाॅ नायर :- मिलिंद भारंबे यांनी कधी अशी तक्रार केली होती का? की, सचिन वाजे हे बायपास करतात प्रोटोकाॅल पाळत नाहीत अशी...

देशमुख - ३० मार्च रोजी आलेल्या रिपोर्टपूर्वी मला कोणतीही तक्रार आलेली नाही.

डाॅ नायर- जून २०२० ते मार्च २०२० पर्यंत तुम्ही केलेले ट्विट आणि पर्सनल व्हिडिओ जे सोशल मिडियावर केलेत. जे विविध तपासा संदर्भात होते. उदा दिलीप छाबरिया केस, फेक काॅलसेंटर केस, टिआरपी केस, फेक फाॅलोअर्स केस ?

देशमुख : उत्तर नाही दिले

डाॅ नायर - मार्च २०२० मुंबई पोलिसांनी फेक फेस मार्स केसची कारवाई केली होती का ?

देशमुख :- यावर देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेत ही प्रकरणं वाजेंच्या नियुक्ती पूर्वीची आहेत.

डाॅ नायर :-अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी व फेक मास्क प्रकरणात तांत्रिक चौकशीसाठी आपण वाजेची मदत घेतली होती का ?

देशमुख :- सचिन वाजेला मी चेहऱ्याने आणि नावानेही ओळखत नव्हतो.

डाॅ नायर :- कुंदन शिंदे व वैभव तुमाणे हे तुमचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते का ?

देशमुख :- उत्तर दिले नाही

डाॅ नायर :- वैभव हे अन्वय नाईक व वाजे यांच्यात कार्डिनेट करायचे का ?

देशमुख :- आठवत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT