'स्वत:च्या राजकारणासाठी कोणीतरी शेतकरी चळवळीचा चुकीचा उपयोग करीत असेल, शेतकऱ्यांचे नुकसान करीत असेल तर ते चालू देणार नाही.'
इचलकरंजी : ‘गत हंगामातील ४०० रुपये व यावर्षी ३५०० रुपये ऊसदर (Sugarcane Rate) न मिळाल्यास माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राजकीय संन्यास घ्यावा,’ असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
‘राजू शेट्टी यांच्या मागणीनुसार उसाला दर मिळाल्यास मला शेतीचे अर्थकारण समजत नाही, असे समजून मी राजकारण सोडतो,’ असे आव्हानही त्यांनी (Sadabhau Khot) पत्रकार परिषदेत दिले.
खोत म्हणाले, ‘यावर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखरेचे उत्पादनही घटणार आहे. हंगाम लांबल्याने शेतकरी आणि कारखानदार यांचेही नुकसान होणार आहे. ऊस कर्नाटकात जाण्याचीही भीती आहे. यासाठी कारखानदारांनी गत हंगामातील फरक २०० रुपये आणि चालू हंगामात पहिला हप्ता ३२५० रुपये देण्यासाठी पुढे यावे. या मागणीसाठी रामचंद्र डांगे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केली असून, लवकरच ही समिती कारखानदारांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.
केवळ लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा चळवळीत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्याची आवश्यकता आहे. स्वत:च्या राजकारणासाठी कोणीतरी शेतकरी चळवळीचा चुकीचा उपयोग करीत असेल, शेतकऱ्यांचे नुकसान करीत असेल तर ते चालू देणार नाही.
तसेच आता लोक जागे झाले आहेत. त्यामुळे कारखानदारांनीही याचे भान ठेवून कारखाने चालवावेत, अन्यथा सहकारी साखर कारखाने कधीकाळी होते, असे म्हणण्याची वेळ येईल.’ दरम्यान, ऊसदराचा प्रश्न कायमचा मिटण्यासाठी साखर कारखान्यांमधील २० किलोमीटरच्या हवाई अंतराची अट रद्द करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.