Former MLA Dnyaneshwar Patil Death Esakal
महाराष्ट्र बातम्या

Former MLA Dnyaneshwar Patil: ड्रायव्हर ते दोन वेळा आमदार... शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

आशुतोष मसगौंडे

भूम परांडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची माहीती समोर आली आहे.

लंग्ज इन्फेक्शन झाल्यामुळे माजी आमदार पाटील यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले होते. पण काल रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सुरुवातीच्या काळात ड्रायव्हर म्हणून काम करणारे पाटील पुढे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात उतरले आणि 1995 आणि 1999 अशा दोन वेळेस ते भूम परंडा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले होते.

एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता.

धाराशिव जिल्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांनी आमदार असतानाही आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची कामे केली आहेत. त्यामुळे या परिसरात पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असूनही पाटील यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली होती. अशात आता पाटील यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनानंतर, कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली.

आमदार कैलास पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, "बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरवला.. परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या निधनामुळे मन सुन्न झाले. त्यांच्या जाण्याने शिवसेना परीवारातील एक जिंदादील सहकारी आम्ही गमावला आहे."

आमदार कैलास पाटील पोस्टमध्ये पुढे म्हणाले "अत्यंत संवेदनशील, जनसेवेचा ध्यास घेऊन कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा आजवरचा सहवास आमच्यासाठी आधाराचा आणि मार्गदर्शक होता. त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहील. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना व कार्यकर्त्यांना शक्ती मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pablo Picasso: कचऱ्यात सापडलेल्या जुन्या पेंटिंगने बनवलं 55 कोटी रुपयांचा मालक; जगप्रसिद्ध चित्रकाराच्या चित्राचा 62 वर्षांनी लागला शोध

Abdul Sattar vs BJP: "तर शिवसैनिक भाजपचा हिशोब करतील"; महायुतीत कलह, शिंदेंच्या मंत्र्याचे खळबळ उडवणारे विधान

Sambhaji Bhide: "गणपती-नवरात्र उत्सवाचा चोथा झाला, हिंदू समाजाला XXX...";  संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

Ankita Walawalkar Evicted: अंकिता वालावलकरचा 'बिग बॉस मराठी ५' मधला प्रवास संपला? चाहत्यांना मोठा धक्का

Zoho CEO: ...अन्यथा कंपन्या टिकणार नाहीत; टॉक्सिक वर्क कल्चरबद्दल काय म्हणाले जोहोचे सीईओ?

SCROLL FOR NEXT