Dr. Shalinitai Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'देवाच्या काठीला आवाज नसतो'

उमेश बांबरे

सातारा : शिखर बँकेतील (Shikhar Bank) अडीच हजार कोटींचा हा घोटाळा असून याबाबत न्यायालयाने कागदपत्रातून स्पष्ट केले आहे. देवाच्या काठीला आवाज नसतो. काठी आपले काम करते, पण ती कोणाला दिसत नाही. फटका मारलेला आवाज होत नाही, पण फटका बसतोच. जनता, न्यायालयाच्या (Court) सहनशिलतेच्या बाहेर गेल्याने आता निकालाला सुरवात झाली आहे. जरंडेश्वरवर ईडीची कारवाई (ED action on Jarandeshwar factory) हे त्यातील पहिले पाऊल आहे. आता सभासदांना त्यांचा कारखाना परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे मत माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील (Former MLA Dr. Shalinitai Patil) यांनी व्यक्त केले. (Former MLA Dr. Shalinitai Patil Reacted To The Action Of ED On Jarandeshwar Sugar Factory Satara Political News)

2019 मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माणिकराव जाधव, मी स्वतः व श्री. आरोरा या सर्वांनी मिळून याचिका दाखल केली होती, असे डॉ. शालिनीताई पाटील यांनी सांगितले.

जरंडेश्वर कारखान्यांवर (Jarandeshwar Sugar Factory) ईडीने कारवाई करून मालमत्ता जप्त केली. या पार्श्वभूमीवर या कारखान्याच्या मुळ मालक व संस्थापिका डॉ. शालिनीताई यांनी आपली भूमिका व्यक्त केली. त्या म्हणाल्या, कर्जाचे हप्ते भरण्यास थोडा उशीरा झाला म्हणून शिखर बँकेने कारखाना विकला. केवळ तीन कोटींचा विषय होता. त्याच बँकेत माझे आठ कोटी ३४ लाख शिल्लक होते. त्यातील तीन कोटी कर्ज खात्यात जमा करा, असे सांगितले होते. तसेच कर्जाला सरकारची गॅरंटी होती. पण, बँक सरकारकडे गेली नाही. न्यायालयातील कागदपत्रांच्या नुसार शिखर बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झालेला आहे. मुळात हे बेकायदेशीर कर्जवाटप आहे. त्याला कोणीही हरकत घेतलेली नाही. देशातील न्याय व्यवस्थेला रामशास्त्री प्रभुणेंची परंपरा आहे. थोडा उशीर लागला पण आता ईडीने मालमत्ता जप्त केली आहे.

२०१९ मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माणिकराव जाधव, मी स्वतः व श्री. आरोरा या सर्वांनी मिळून याचिका दाखल केली होती. यावर न्याय मिळाला नाही. न्यायालयाने एफआयआर दाखल करा, असे सांगितले. त्यानुसार मी स्वतः ईडीमध्ये जाऊन अर्ज दाखल केला. वर्ष दोन वर्षे झाली तरी काहीही झाले नाही. त्यामुळे आम्ही दुसरा अर्ज केला. यामध्ये सर्व अभ्यास करून ईडीने आमच्या म्हणण्याला पाठींबा दिला. त्यांना कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश मिळाल्यामुळे त्यांनीही कारवाई केली आहे.या सर्व प्रक्रियेमुळे आता जरंडेश्वर कारखाना सभासदांना कारखाना परत मिळेल. कारखान्याचे २७ हजार सभासद, दहा कोटींचे शेअर भांडवल आहे. ४० वर्षांपासून मला सभासदांचा पाठींबा आहे. कारखान्याची कधीही निवडणूक झाली नाही. एकदा विरोधकांच्या चिथावणीला बळीपडून निवडणूक लावली. पण, त्यांची फजिती झाली. त्यांना तीन टक्के व आमच्या पॅनेलला ९७ टक्के मते मिळाली. त्यानंतर कोणीही निवडणूक करण्याचा प्रयत्न केला नाही. आता सभासदांना जरंडेश्वर कारखाना परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. तसेच न्यायालयाने न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेंची (Justice Ramshastri Prabhune) परंपरा कायम ठेवल्याबद्दल त्यांचेही मी अभिनंदन करते.

कारखान्याच्या बेकायदेशीर विक्रीबद्दल आम्ही न्यायालयात गेलो होतो. कारखान्याची २१४ एकर जमिन असून त्यांनी या जमिनीवर सहाशे कोटींचे कर्ज घेतलेले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार कारखान्याची किंमत १५०० कोटी रूपये होऊ शकतो. २०१० ते २०१७ या कालावधीत महाराष्ट्रातील ५० कारखाने शिखर बँकेने विकले होते. त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या सुचनेनुसार तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमला. गुरू कमोडिटीने ६५ कोटींला हा कारखाना विकत घेतला. ज्या सोसायटीची वार्षिक उलाढाल ६३ लाखांची व नफा दहा लाखांचा आहे. त्यांना हा कारखाना कसा मिळाला. शिखर बँका व जिल्हा बँका खासगी लोकांसाठी नाहीत.शिखर बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा असल्याचे न्यायालयातील कागदपत्रात म्हटले आहे. देवाच्या काठीला आवाज नसतो. पण काठी आपले काम करते. कोणाला दिसत नाही. फटका मारलेला आवाज ही होत नाही पण फटका बसतो. त्यांचे शंभर अपराध पूर्ण झाले की हा फटका बसतो. जनता व न्यायालयाच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्याने निकालाला सुरवात झाली आहे. हे पहिले पाऊल आहे. लवकरच कारखाना सभासदांना परत मिळेल, अशी आशा डॉ. शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Former MLA Dr. Shalinitai Patil Reacted To The Action Of ED On Jarandeshwar Sugar Factory Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT