Dr. Mahaswamy sakal
महाराष्ट्र बातम्या

माजी खासदार डॉ. महास्वामींच्या जात प्रमाणपत्रावर बुधवारी सुनावणी! १०९ वर्षांपूर्वीच्या जन्म-मृत्यू नोंदवहीवरील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आहे. अक्कलकोट तहसीलदारांकडून डॉ. महास्वामींच्या वडिलांची १९१५ मधील जन्म-मृत्यू नोंदीचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्राप्त झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आहे. अक्कलकोट तहसीलदारांकडून डॉ. महास्वामींच्या वडिलांची १९१५ मधील जन्म-मृत्यू नोंदीचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्राप्त झाला आहे. त्यावर आता बुधवारी (ता. २१) सुनावणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी डॉ. महास्वामी यांनी जात प्रमाणपत्र बनावट जोडल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकुरे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. २०१९च्या निवडणूक निकालानंतर सुरू झालेला हा जात प्रमाणपत्राचा तिढा पाच वर्षांनंतरही सुटलेला नाही. तत्पूर्वी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने डॉ. महास्वामींकडील प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता. त्याविरोधात महास्वामींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या जात प्रमाणपत्रावर पुन्हा सुनावणी सुरू झाली. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार समितीने डॉ. महास्वामींच्या वकिलांची मागणी मान्य करत त्यांच्या वडिलांची गौडगाव ग्रामपंचायतीतील १९१५ मधील जन्म-मृत्यू नोंदीची तपासणी परराज्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांच्या माध्यमातून ती नोंदवही परराज्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविण्यात आली. आता त्यांचा अहवाल समितीकडे प्राप्त झाला असून त्याची एक प्रत तक्रारदारांनाही देण्यात आली आहे.

दक्षता पथकाकडे मागितला स्वयंस्पष्ट अहवाल

माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी सुरू आहे. त्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दक्षता पथकाला डॉ. महास्वामींच्या जात प्रमाणपत्रासंबंधीचा अहवाल विविध मुद्द्यांवर मागितला आहे. या पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यावर समितीला निर्णय घेणे सोयीचे होणार आहे. पाच वर्षांपूर्वी सुरू झालेले हे प्रकरण आता अंतिम टप्प्यावर आले आहे. बुधवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुधवारी होईल सुनावणी

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या वडिलांच्या गौडगाव ग्रामपंचायतीकडील जन्म-मृत्यू नोंदीचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याची प्रत तक्रारदारालाही देण्यात आली आहे. दक्षता पथकाचाही अहवाल काही दिवसांत येईल. या प्रकरणाची आता बुधवारी सुनावणी होईल.

- बी. जी. पवार, अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: प्रचंड चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; निफ्टीने 23,532 अंकांवर, कोणते 10 शेअर्स वाढले?

Latest Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर खाजगी विमानाचं ईम्मर्जन्सी लँडिंग

अखेर तारक मेहतामधील भिडेंची सोनू अडकणार लग्नबंधनात ! टप्पूशी नाही तर या क्रिएटरशी डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ

३८ चेंडूंत १७८ धावांचा पाऊस! RCB चा निर्णय चूकला, संघातून रिलीज केलेल्या Mahipal Lomror चे खणखणीत त्रिशतक

Mallikarjun Kharge: खर्गेंच्या सभेचा मंडप कोसळला! त्र्यंबकेश्वरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT