Eknath Shinde arrest parambir singh  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: आता एकनाथ शिंदेंचंही नाव; अटकेसाठी दबाव असल्याचा परमबीर सिंहांचा दावा

Latest Mumbai Police News: कुणावरही खोटा गुन्हा दाखल करणार नाही असे देशमुख यांना सुनावल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Param Bir Singh: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्यासाठी माझ्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता.

असा खळबळजनक आरोप करत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. आपण मात्र कुणावरही खोटा गुन्हा दाखल करणार नाही असे देशमुख यांना सुनावल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना आज पुन्हा एकदा ‘मविआ’च्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. ‘‘तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या इतर काही नेत्यांना अटक करण्यासाठीसुद्धा अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता.

यासंदर्भात शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ आणि उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवास्थानी बैठक झाली होती,’’ असे ते म्हणाले. ‘‘ या बैठकीला शरद पवार, अनिल देशमुख, अनिल गोटे उपस्थित होते.

या बैठकीत त्यांनी माझ्यावर विरोधकांवर खोटी कारवाई करण्यासंदर्भात दबाव आणला. मात्र, मी त्यांना नकार दिला. मी अशाप्रकारे कुणावरही खोटा गुन्हा दाखल करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले,’’ असेही परमबीर यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT