Former State Home Minister Anil Deshmukh on Pune Porsche Accident marathi News  
महाराष्ट्र बातम्या

Pune Porsche Accident : पुण्यातील आरोपीला व्हीआयपी ट्रिटमेंट कशी? माजी गृहमंत्र्यांचा सवाल

या अपघातात तर दोन निष्पाप लोकांचे प्राण गेले आहे. मग उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील, असा सवालही अनिल देशमुख यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली : भरधाव गाडी चालवून दोन निष्पाप लोकांना जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवाल या आरोपीला पिझ्झा व इतर व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यासाठी राज्य सरकारमधील कोणत्या वरिष्ठांनी आदेश दिले होते, असा सवाल राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

दिल्लीत काही खासगी कामानिमित्त आले असताना प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, वेदांत अग्रवालने पबमध्ये दारू पिऊन वेगाने गाडी चालविली. यात दोघांना प्राणास मुकावे लागले. यानंतरही या आरोपीला तात्काळ जामीन मिळाला. जामीनाच्या काळात त्याला पिझ्झा पुरविण्यात आला. एखाद्या व्हीआयपीप्रमाणे त्याची बडदास्त ठेवण्यात आली होती. गाडीखाली कुत्रा आले तरी विरोधक माझा राजीनामा मागतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या अपघातात तर दोन निष्पाप लोकांचे प्राण गेले आहे. मग उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील, असा सवालही अनिल देशमुख यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT