PM Kisan Yojana Helpline Numbers
PM Kisan Yojana Helpline Numbers  esakal
महाराष्ट्र

Fraud PM Kisan App: सावधान! व्हॉट्सअॅपवर 'पीएम किसान ॲप'ची लिंक अन् शेतकऱ्यांचे सात लाख गायब

Amit Ujagare (अमित उजागरे)

हिंगोली : शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १७वा हप्ता नुकताच डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. तसंच १८व्या हप्त्याची यादी देखील पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आता प्रकाशित करण्यात आली आहे.

याच दरम्यान, हिंगोलीतील ५ शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सअॅपवर त्यांना पीएम किसान अॅपची लिंक पाठवून त्यांच्या खात्यातून एकूण सात लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत. (Fraud PM Kisan App Link on WhatsApp and rupees seven lakh withdraws by farmers account)

त्यामुळं आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही सतर्क करणारी बातमी आहे. मराठवाड्यात सायबर क्राईमद्वारे फसवणूक करणाऱ्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावमध्ये मोबाईलवर पीएम किसान अॅपची बनावट लिंक पाठवून सायबर भामट्यांनी पाच शेतकऱ्यांच्या खात्यातील सात लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे.

बँकेत असलेल्या खात्यामधून अचानक पैसे डेबिट होत असल्याचे मेसेज आल्यानं शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली, त्यानंतर या शेतकऱ्यांनी तातडीने हिंगोलीच्या पोलीस मुख्यालयातील सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, हिंगोली पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला असून पोलीस शेतकऱ्यांचे पैसे पळवणाऱ्या या सायबर भामट्यांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऋषी सुनक यांचा पराभव करणाऱ्या पक्षाचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात होता महत्त्वाचा रोल, काय आहे नेहरू कनेक्शन

Iran's New President: कट्टरपंथी इराणच्या अध्यक्षपदी पुरोगामी पेझेश्कियान; जाणून घ्या इथून पुढे कसे असणार भारत-इराण संंबंध

Ashadhi Wari 2024 : चांदीच्या मेघडंबरीत विसावली विठुमाउली; नांदेडच्या भाविकाकडून तब्बल 2 कोटी 45 लाखांची चांदी अर्पण

K Armstrong: कोण होते तामिळनाडू बसपा प्रमुख आर्मस्ट्राँग? ज्यांची भररस्त्यात झाली हत्या

Maharashtra Live News Updates : मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १५ जुलैपर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT