friend gangster Deepak Kumar Tinu accused murder of Punjabi singer Sidhu Moosewala Punjab Police Mumbai airport  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sidhu Moosewala murder case : कुख्यात गुंड दीपक टिणूची मैत्रिण अटकेत

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी आरोपी कुख्यात गुंड दीपक कुमार ऊर्फ टिणू याच्या मैत्रिणीला मुंबई विमानतळावर रविवारी रात्री पंजाब पोलिसांनी अटक केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी आरोपी कुख्यात गुंड दीपक कुमार ऊर्फ टिणू याच्या मैत्रिणीला मुंबई विमानतळावर रविवारी रात्री पंजाब पोलिसांनी अटक केली. भारतातून मालदीवमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दीपकच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी अटकेची माहिती दिली.
आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य ​​टिनू पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. पंजाब पोलिसांचा दावा आहे, की पकडलेल्या मुलीने गुंड टिनूला पळून जाण्यास मदत केली होती. तसेच इतर आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे; मात्र टिनू भारतात आहे की अन्य कोणत्या देशात, याचा पोलिस शोध घेत आहेत.

कोण आहे टिनू?
टीनू लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असून, सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पोलिस त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत होते. कपूरथळा तुरुंगात टिनू शिक्षा भोगत होता. मुसेवाला हत्याप्रकरणाच्या नियोजनातील शेवटचे फोनवरील संभाषण २७ मे रोजी लॉरेन्स आणि टिनू यांच्यात झाले होते आणि सिद्धूची २९ मे रोजी हत्या झाली होती. दीपकवर पंजाब, हरियाना, राजस्थान आणि दिल्लीसह विविध राज्यांमध्ये ३४ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि खंडणीचे आरोप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT