शिवसेनेची मुलुखमैदान तोफ असा उल्लेख केले जाणारे फायरब्रांड नेते संजय राऊत . मध्यंतरी चर्चा झाली ती राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची, त्यात केलेल्या संजय राऊत यांच्या उल्लेखाची. एका जाहीर सभेत 'आज पवारसाहेब संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. असे वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होत. पण विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्यामुळेच संजय राऊत शिवसेनेत आलेत.(Friendship day Sanjay Raut Raj Thackeray Balasaheb Thackeray Shivsena)
या गोष्टींमुळे संजय राऊत बाळासाहेब ते उद्धव ठाकरेंचे खास होऊ शकले
संजय राऊतांच बालपण माहिममध्ये गेलं. त्यांचे वडिल राजाराम राऊत हे JKW कंपनीत कामगार होते. आणि तिथले कामगार नेते देखील होते. कट्टर शिवसैनिक असणारे राजाराम राऊत हे बाळासाहेबांच्या देखील तितकेच जवळचे होते. त्यातूनच संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घरोब्याचे संबध निर्माण झाले.
आंबेडकर कॉलेजमधून B.com झालेल्या या मुलाला पोटापाण्याला लावायचं म्हणून बाळासाहेबांनीच संजय राऊतांना माधव गडकरींकडे पाठवलं होतं. शिवसेनेच्या शिफारसीवर आला म्हणून गडकरी त्यांचा उल्लेख गुंड असा करायचे.
जागा नाही म्हणून संजय राऊतांना मार्केटिंग, जाहिरात, वितरण अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागलं. अशातच त्यांच्यावर जबाबदारी आली ती लोकप्रभेत लिहण्याची. संधी ओळखून संजय राऊतांनी क्राईम रिपोर्ट चालू केलं. त्या काळात म्हणजे १९८५ च्या सुमारास संजय राऊत क्राईम रिपोर्ट करु लागले. त्याचवेळी लोकसत्ता ला राज ठाकरे व्यंगचित्र काढत होते. राऊत लोकप्रभा ला क्राइम लिहायचे. समवयस्क असल्याने दोघांच्यात मैत्री झाली. राज ठाकरे त्यांना मातोश्री वर घेऊन गेले. आणि बाळासाहेबांना ओळख करुन दिली.
दरम्यान, मराठीत एकतर क्राईम स्टोरी छापून येत नसतं किंवा त्यांच स्वरुप बातम्यांच्या स्वरुपात असे.पण संजय राऊतांनी आपली वेगळी शैली विकसीत केली. वेगवेगळ्या कवर स्टोरीमुळे लोकप्रभाचा अंक हातोहात खपू लागला आणि संजय राऊत लोकांच्या नजरेत येवू लागले.
पण या सगळ्यात राऊतांवर खास नजर होती ती बाळासाहेबांची. बाळासाहेबांना हा पोरगा काहीतरी करेल अस वाटायचं. क्राईम रिपोर्ट करता करता संजय राऊतांचा मोर्चा राजकिय रिपोर्टिंगकडे वळला. या संधीच सोनं करत आपल्या शब्दांनी लोकप्रभा गाजवू लागले.
छगन भुजबळ, नारायण राणे हे बाळासाहेबांप्रमाणेच तोडीस तोड बोलायचे. पण प्रश्न होता तो बाळासाहेबांप्रमाणे लिहणाऱ्याचा. आपल्या शेलक्या शब्दात अचूक घाव घालणारा माणूस बाळासाहेबांकडे नव्हता.
अशातच छगन भुजबळांनी शिवसेनेला रामराम केला. छगन भुजबळांनी सेनेला राम राम ठोकताच लोकप्रभात कवर स्टोरी छापण्यात आली. ही कवर स्टोरी केली होती संजय राऊतांनी. संजय राऊतांची ती स्टोरी बाळासाहेबांच्या नजरेत आली बाळासाहेबांच्या लक्षात आलं.
बाळासाहेबांनी २९ वर्षीय राऊतांना बोलावून त्यांना सामनाचं कार्यकारी संपादक केलं. राज ठाकरेंप्रमाणेच उद्धव ठाकरेंसोबत देखील त्यांचे त्याच ताकदीचे संबध प्रस्थापित झाले. संजय राऊत बाजूला न पडता त्यांच महत्त्व अधिक वाढत गेलं. अगदी राज ठाकरेंसोबत असणारे मैत्रीचे संबध लक्षात असून देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना सेनेत स्कोप दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.