Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Politics: मविआला धक्का! आघाडीतील 'या' पक्षाने दिला स्वबळाचा नारा; आगामी निवडणुकांमध्ये मविआच्या विरोधात उमेदवार

गडचिरोली: शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली: शेतकरी कामगार पक्ष राज्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असतानाही विधानसभा निवडणुकीत दगाबाजी करून उमेदवार पराभूत केले. जिल्ह्यातही शेकापला गृहित धरले जाते.

त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपसह महाविकास आघाडीच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाने प्रागतिक पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करत येणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये स्वबळावर उमेदवार उभे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय सभेत एकमताने घेतला.

स्थानिक प्रेस क्लब भवनात शेतकरी कामगार पक्षाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे नेते रामदास जराते, जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस रोहिदास कुमरे.

महिला नेत्या जयश्री वेळदा, तुकाराम गेडाम, सरपंच दर्शना भोपये, सरपंच सावित्री गेडाम, डॉ. गुरुदास सेमस्कर, माजी सरपंच निशा आयतुलवार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत भोयर, ग्रामपंचायत सदस्य कविता ठाकरे, रमेश चौखुंडे, प्रदीप आभारे प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली विधानसभेसह जिल्हा परिषदेच्या ३० जागांवर पक्षाच्या खटारा या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा आणि उर्वरित जागा प्रागतिक पक्षांसह मिळून लढण्याचा ठरावही सभेत संमत करण्यात आला.

जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीकरिता इच्छुकांच्या नावावर चर्चा करण्यात आली. तसेच निवडणुकांपूर्वी पक्षाची संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी गावागावांत शाखा स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

या सभेला ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोयर, ग्रामपंचायत सदस्य विलास अडेंगवार, प्रभाकर डोईजड, दामोदर रोहनकर, देवराव शेंडे, क्रिष्णा नैताम, मारोती आगरे, रेवनाथ मेश्राम, डंबाजी भोयर, तुळशीदास भैसारे.

नितीन मेश्राम, पवित्र दास, अनिमेश बिस्वास, विश्वनाथ म्हशाखेत्री, भैय्याजी कुनघाडकर, सुरेश चौधरी, देविदास मडावी, रामदास आलाम, रमेश ठाकरे, रोशन मेश्राम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT