Ganapati-Bappa 
महाराष्ट्र बातम्या

गणेशोत्सव 2021: गणेशमूर्तींच्या उंचीबद्दलचे निर्बंध कायम

बाप्पाच्या उत्सवासाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर; पाहा काय आहेत अटी

विराज भागवत

बाप्पाच्या उत्सवासाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर; पाहा काय आहेत अटी

मुंबई: राज्यातील सर्व गणेशभक्तांचे (Ganesh Devotees) लक्ष लागून राहिलेल्या गणपती बाप्पाचे सप्टेंबर महिन्यात आगमन होणार आहे. या बाप्पाच्या उत्सवासाठी काय निर्बंध (Restrictions) लावले जातील याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) धुमधडाक्यात साजरा करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांचा यंदाही हिरमोड झाला असून राज्य सरकारने (MVA Govt) नियमावली (Guidelines) जाहीर केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदादेखील गणेशमूर्तींची (Ganesh Idols) उंची मर्यादितच असावी असा आदेश (Orders) काढण्यात आला आहे. गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित असणार असून सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची ४ फूट तर घरगुती बाप्पाची मूर्तीची उंची २ फूट असावी असे आदेश काढण्यात आले आहे. याशिवाय, विसर्जन (Departure) देखील कृत्रिम तलावात करावे आणि शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी, असेही सांगण्यात आले आहे. (Ganapati Bappa Festival 2021 Uddhav Thackeray Maharashtra Govt declares Guidelines See Rules and Regulations)

कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

१. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

२. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

३. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटांच्या मर्यादेत असावी.

४. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील पातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात

५. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे, तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम शिबीरे (उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य याणाद्वारे कोरोना, मलेरिया, डेग्यू इ. आजार आणि उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

७. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

८. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

९. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

१०. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच धर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

११. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

१२. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

१३. कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT