toll naka sakal
महाराष्ट्र बातम्या

Ganapati Utsav 2024: गुड न्यूज! गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी; राज्य सरकारची घोषणा

संतोष कानडे

Maharashtra Government: गणपती उत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. राज्य सरकारने प्रवाशांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी मोफत बससेवा सुरु केली होती. यावर्षी टोलमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

७ सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून या सणाला मुंबई, ठाणे व पालघर विभागातून चाकरमानी कोकणात जातात. यंदाही चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १,३०१ बस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत.

मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरदरम्यान ४,३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकांतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत.

गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतूट नाते आहे. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सुमारे ४,३०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी २,०३१ बस फुल्ल झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Noel Tata: टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड

नवी मुंबई विमानतळावर सुखोई फायटरचे यशस्वी लँडिंग! धावपट्टीची चाचणी पूर्ण, एअरपोर्ट कधी सुरू होणार?, पहा थरारक Video...

झिंबू, झिंबू....! शाहिन आफ्रिदीने भर मैदानात Babar Azam ला चिडवले? Video viral

Ratan Tata: आंबेगाव तालुक्यातल्या तरुणाने बनवलेल्या मशरूम सूपचे फॅन होते रतन टाटा! दर शनिवारी ब्रेकफास्टला...

Amitabh Bachchan : शोले फ्लॉप झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी बोलावली इमर्जन्सी मिटिंग ; "हा सगळा मूर्खपणा..."

SCROLL FOR NEXT