ganpat gaikwad firing case BJP MlA son vaibhav gaikwad arrested Marathi Crime News  
महाराष्ट्र बातम्या

Ganpat Gaikwad Firing Case : गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजीत यादवला अटक; मुलगा अद्याप फरार

Ganpat Gaikwad Firing Case Latest Update : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने गायकवाड यांचा खासगी चालक रणजीत यादव याला शनिवारी अटक केली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने गायकवाड यांचा खासगी चालक रणजीत यादव याला शनिवारी अटक केली आहे. रविवारी उल्हासनगर कोर्टात रणजीत याला हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी गायकवाड यांचा निकटवर्ती विकी गणात्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Ganpat Gaikwad Firing Case Latest Update)

जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यातच ही गोळीबाराची घटना घडली शुक्रवारी रात्री आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यासह 6 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड,

संदीप सरवणकर, हर्षल केणे तसेच विकी गणात्रा याला अटक केली आहे. गायकवाड यांचा मुलगा वैभव याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल असून वैभव व नागेश बडेकर याचा पोलीस शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी विकी याने ठाणे गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण केले होते. पोलिसांनी त्याला अटक केली. आणि आता रणजीत यादवला अटक करण्यात आली आहे. रणजीत यादव हा आमदार गणपत गायकवाड यांचा खाजगी चालक आहॆ. क्राईम ब्रँच पोलिसांनी रणजीत यादवला शनिवारी ताब्यात घेत रविवारी उल्हासनगर कोर्टात हजर केले आहे.

शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल....

भाजप आमदार गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संबंधित घटना ही जागेच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्व 70 जणांवर जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी उल्हासनगर न्यायालयात चार जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कुठली ही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येने शिरून, जागेवरील कामगारांना शिवीगाळ करत, जागेतील सामानाचे नुकसान केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय. तर पोलिसांनी इतर 66 जणांची चौकशी सुरू केली आहे. आत्तापर्यंत पाच जणांची चौकशी याप्रकरणी करण्यात आली आहे. महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT