स्फोट किंवा आगीमागे असलेली कारणे नागरिकांच्या हलगर्जीपणालाच वलयांकित करतात.
कऱ्हाड : गॅसच्या स्फोटात (Gas Cylinder Explosion) जीवित तसेच वित्तहानी होण्याचे प्रकार जिल्ह्यात विविध ठिकाणी घडत आहेत. पाच वर्षांत किमान सात वेगवेगळ्या ठिकाणी गॅस गळतीने स्फोट झाले आहेत. कऱ्हाडच्या स्फोटात दोघांना जीव गमवावा लागला, तर अन्य सातजण जखमी झाले. त्या संदर्भातील आरोप-प्रत्यारोपांवर फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाने पडदा टाकला. मात्र, त्यातून सिलिंडर कसा वापरावा? याबाबत नागरिकांत जागरूकता आणण्यासाठी शासकीय पातळीवर व्यापक प्रयत्नांची गरज यातून स्पष्ट झाली.
कऱ्हाडात मंगळवार पेठ, मुजावर कॉलनी, रैनाक गल्ली व गुरुवार पेठेतील बटाणे गल्ली, चावडी चौकात तर पुन्हा मुजावर गॅस स्फोटाने येथील असुरक्षित वापर अधोरेखित झाला. तीन वर्षांत सात गॅस स्फोट झाले, त्यामागे सिलिंडर व गॅसचा असुरक्षित वापरणे हीच कारणे आहेत. त्यामुळे त्याबाबत मोठी जागरूकता करण्याची गरज आहे. त्यासाठी गॅस कंपनी, डीलर, नागरिक, पालिका, पोलिस व गॅस सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यात सहभाग घेण्याची गरज आहे. स्फोट किंवा आगीमागे असलेली कारणे नागरिकांच्या हलगर्जीपणालाच वलयांकित करतात.
एका घटनेतून दुसरा कोणी बोध घेत नाही. त्यामुळे एका पाठोपाठ एक अशा घटनांना पाच वर्षांत नागरिकांना सामोरे जावे लागले. शहरी भागात मिळणाऱ्या सुविधा ग्रामीण भागातही मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. गॅस गळती किंवा अन्य तक्रारीसाठी सायंकाळी फोन केल्यास ती तक्रार दुसऱ्या दिवशी पाहिली जाते. त्यामुळेही नागरिक त्रस्त दिसतात. सुरक्षेचा विचार करता सर्वच पातळ्यांवर सुरक्षा हव्या आहेत.
शेगडी वापरात नसताना रात्री झोपण्यापूर्वी रेग्यलेटरचे बटन असल्याची खात्री करा
सिलिंडर व अन्य साधनांची दुरुस्ती स्वत: करू नका
गॅस कनेक्शनचे सर्व भाग उत्तम आहेत का, याची खात्री करा
काही शंका दोष आढळल्यास डिलरशी संपर्क साधा
स्वयंपाक घरात काम करताना सुती कपडे वापरा
गॅसवरील गरम भांडी हाताळण्यास साडी किंवा ओढणीचा वापर टाळा
लहान मुलांना दूर ठेऊनच स्वयंपाक करा
प्लॅस्टिकच्या वस्तूही शेगडीपासून दूर ठेवा
रबरी पाइप खराब झाल्यास त्वरित बदला
वापरात नसलेले किंवा संपलेले सिलिंडरवर सेफ्टी कॅप लावा
रेग्युलेटरचे (Regulator) बटन बंद करून सिलिंडरचा व्हॉल्व बंद झाल्याची खात्री करावी
रेग्युलेटरचे बटन सुरू करून सिलिंडरचा व्हॉल्व उघडा
शेगडीची बटने बंद असल्याची खात्री करा
गॅस गळतीचा वास येत असल्यास रेग्युलेटरचा व्हॉल्व सुरू करू नये
घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने शेगडीचे बटन फिरवून गॅस सुरू करा
वापर संपल्यानंतर बर्नर बंद करा
रेग्युलेटरचे बटन बंद करा म्हणजे सिलिंडरचाही व्हॉल्व बंद होईल
सिलिंडरपेक्षा शेगडी नेहमी दोन फूट उंचावर असावी
सिलिंडरची पाइप किंवा रेग्युलेटर लिकेज वास आल्यानंतर काळजी घ्यावी
शेगडी भिंतीलगत असल्यास दुर्घटनेत फार नुकसान होत नाही
शेगडी स्वयंपाक घरात खिडकीचा पडदा व वाऱ्याच्या झोतापासून दूर ठेवावी
शेगडीच्या वरच्या बाजूला फडताळ किंवा रॅक ठेऊ नका
सिलिंडरची पाइप उंदीर कुरतडत नाहीत
पाइपने अग्निरोधकाचे काम होते
हवामानाच्या बदलाचा परिणाम होत नाही
पाइपामुळे मजबूत पकड मिळते
काही रबर तीन आवरणांमध्ये तयार केलेल्याही असतात
सिलिंडर नेहमी उभाच ठेवा. ज्यामुळे गॅस गळीत टाळता येते
सिलिंडरचा व्हॉल्व वरच्या दिशेस राहील, याची कटाक्षाने काळजी घ्या
उष्णतेचा उगम होणाऱ्या किंवा उघड्या ज्योतीपासून सिलिंडर लांब असावा
सिलिंडर इतक्या जवळही असावा, की त्याच्याजवळ लगेच पोचता आले पाहिजे
सिलिंडर जेथे ठेवला आहे, तेथे हवा खेळती असली पाहिजे. याची काळजी घ्या
सिलिंडर कधीही रंगवू नका
सर्व प्रथम रेग्युलेटर बंद करा.
समई, दिव्यासारख्या सर्व प्रकारच्या ज्योती विझवा.
दारे खिडक्या उघडून हवा खेळती ठेवा.
काडी किंवा अन्य कोणतीही वस्तू पेटवू नका.
विजेचा कोणताही स्वीच चालू किंवा बंद करू नका.
वितरक किंवा डिलरशी त्वरित संपर्क साधून माहिती द्या.
अग्निशामक दल व पोलिसांनाही त्वरित कळवा.
घरातील लोकांना बाहेर काढा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.