Gautam Adani Kidnapped esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautam Adani Kidnapped : खतरनाक डॉनने केलेलं अदानी यांचं अपहरण, इतके रुपये देऊन झालेली सुटका?

गौतम अदानी एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात

सकाळ डिजिटल टीम

Gautam Adani Kidnapped : गौतम अदानी एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांनाही स्थान देण्यात आले होते. पण आज आम्ही तुम्हाला गौतम अदानी यांच्या आयुष्याशी संबंधित एका वेगळ्या पैलूची ओळख करून देणार आहोत. या प्रसिद्ध व्यावसायिकाचेही एकदा अपहरण झाले होते.

अदानी यांनी आपल्या करिअरची सुरुवात हिरे व्यापारी म्हणून केल्याचे सांगितले जाते. 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत, अदानी एक यशस्वी उद्योगपती म्हणून गणले जाऊ लागले आणि ते हळूहळू मीडियाच्या लक्ष केंद्रीत होऊ लागले.

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अपहरणाची घटना 1 जानेवारी 1998 ची आहे. मोहम्मदपुरा येथून कारमधून जात असताना गौतम अदानी आणि शांतीलाल पटेल यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यातयेते. कारसमोर स्कूटर उभी करून कार थांबवण्यात आली आणि त्यानंतर काही लोक आले, त्यांनी दोघांचे अपहरण केले, असा आरोप करण्यात आला आहे.

सरखेज पोलिस स्टेशनचे तत्कालीन उपनिरीक्षक आरके पटेल यांनी एफआयआर नोंदवला होता, ज्यामध्ये 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.गौतम अदानी आणि शांती पटेल यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचेही यावेळी उघड झाले. एकदा लंडनच्या फायनान्शिअल टाईम्सने अदानीला या घटनेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की 'माझ्या आयुष्यात 2-3 दुर्दैवी घटना घडल्या होत्या...त्यापैकी ही एक आहे'.

कुप्रसिद्ध गँगस्टर फजल-उर-रहमान उर्फ फजलू रहमानवर अदानी यांचे अपहरण केल्याचा आरोप होता. फजलू हा एकेकाळी अंडरवर्ल्डच्या दुनियेतील दाऊद इब्राहिमचा प्रतिस्पर्धी डॉन होता, असे म्हटले जाते.

फजलूबद्दल सांगितले जाते की तो मूळचा बिहारचा आहे . खंडणी, अपहरण, दरोडा, खुनाच्या गुन्ह्यातील फजलू आरोपींमुळे व्यापारी हादरायचे. तो 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2000 च्या सुरुवातीस सक्रिय होता. गौतम अदानी यांना सोडण्याच्या बदल्यात 15 कोटींची खंडणी घेतल्याचीही चर्चा होती.

या दुर्दैवी घटनेशिवाय 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये जेवत असताना गौतम अदानी यांच्या आयुष्यात एक घटना घडली . त्याचवेळी दहशतवाद्यांनी हॉटेल ताजवर हल्ला केला होता. अदानी हॉटेलच्या तळघरात लपले. या हल्ल्यात 160 जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT