John Michael Sakal
महाराष्ट्र बातम्या

Pune German Farmer : महाराष्ट्रातील जर्मन शेतकऱ्याची यशोगाथा; अनोख्या प्रयोगाचं यशस्वी व्यवस्थापन

सात एकर शेतात तब्बल २४० प्रकारची ३५ हजार झाडे, सेंद्रीय पद्धत, शेतातील नैसर्गिक तळे, पाणी व्यवस्थापन, कामगाराकडे वॉकीटॉकी आणि एकंदरीत शेती व्यवस्थापन पाहून डोकं सुन्न पडतं.

दत्ता लवांडे

आयुष्यात एवढं ध्येयवेडं असावं माणसाने... जर्मनीचं एक जोडपं भारतात आलं आणि पुण्यापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर पडीक आणि डोंगरउतारावर असलेल्या माळरानावर जवळपास १२ ते १३ कोटी रूपये खर्चून एकात्मिक सेंद्रीय शेतीचं नंदनवन फुलवलं... एका शेतीमध्ये जवळपास ५० प्रकारचे प्रयोग केलेत यांनी. सात एकर शेतात तब्बल २४० प्रकारची ३५ हजार झाडे, सेंद्रीय पद्धत, शेतातील नैसर्गिक तळे, पाणी व्यवस्थापन, २६ कामगार, प्रत्येकाकडे वॉकीटॉकी आणि एकंदरीत शेती व्यवस्थापन पाहून डोकं सुन्न पडतं.

जॉन मायकल आणि त्यांची बायको अंजी हे या प्रकल्पाचे जनक... अफाट प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे दोघांचंही... व्यवहारिक आणि तेवढंच प्रॅक्टिकल... वेळेबाबत प्रचंड काटेकोर.ज्या लोकांनी आधी मेसेज किंवा फोन करून वेळ घेतली नव्हती त्यांचा प्रचंड राग येतो या व्यक्तीला. "हम कामवाले आदमी है... टाईम नही है हमारे पास... सो आने से पहले बता देने का" अशा सफाईदार हिंदी भाषेत समोरच्याला बोलतो हा अवलिया. जवळपास दोन अडीच तास चर्चा करूनही माणसाने स्वत:सोबत एकसुद्धा फोटो काढू दिला नाही हे विशेष.

हेही वाचा - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

जॉन मायकल शाळेसाठी मदतकार्य करताना
शेती प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या महिला

जॉन मायकल आणि अंजी मायकल. हे दाम्पत्य मूळ जर्मनीचं. भारतात शेतीमध्ये काहीतरी नवा प्रयोग करण्याच्या हेतूने २०१९ साली पुण्यातील भोर तालुक्यातील कांबरे गावात डोंगर उतारावरील सात एकर जमीन खरेदी केली. यासाठी त्यांना अनेक परवानग्या मिळवाव्या लागल्या. शेतीला लागणाऱ्या पाण्याच्या नियोजनासाठी शेतातच छोटं तळं बांधलं, विहीर खोदली. पण हे पाणी शेतीला देण्यासाठी लाईटची गरज होती. लाईटचं कनेक्शन शेतापर्यंत आणण्यासाठी अनेक अडचणी आल्या पण हा माणूस थांबणारा नव्हता म्हणून परत एकदा सुरू झाला तो खडतर प्रवास...

जमीन घेतली त्यावेळी तब्बल २० हजार झाडे आणि नंतरचे मिळून ३५ हजार झाडे यांनी शेतात लावली होती. डोंगरउतारावरील शेती असल्याने पाणी थांबायला मार्ग नव्हता. शेतात तळं बांधलं होतं पण ते पाणी शेताला देण्यासाठी लाईटची गरज होती. मग त्यांनी सामान वाहण्यासाठी उपयोगात असणाऱ्या कंटेनरपासून तयार केलेल्या घरावर सौरउर्जेच्या प्लेट टाकल्या आणि शेतासाठी आणि रोजच्या वापरासाठी लागणारी सगळीच वीज तयार केली. एवढंच नाही तर शेतीच्या उंचवट्यावर चार पाच ठिकाणी टाक्या तयार करून कोणत्याही प्रकारची उर्जा न वापरता शेतात पाणी देण्याचं तंत्र यांनी तयार केलंय. काम्बाफार्म असं या प्रकल्पाला नाव दिलंय.

KAMBAfarm Structure
पाणीव्यवस्थापन आणि सौरउर्जा प्रकल्प

शेतात लावलेली तब्बल ३५ हजार झाडे फक्त सेंद्रीय पद्धतीने वाढवले जातात. वेगवेगळ्या प्रकारे जीवामृत तयार करून झाडांना दिलं जातं. शेतातील झाडांच्या पानांचा आणि गवताचा वापर करून केलेलं मल्चिंग पाहून थक्क व्हायला होतं. शेतातील झाडाची एक काडीही इथे वाया जात नाही हे विशेष. लाकडाचे तुकडे करून ते पुन्हा शेतात टाकले जातात. लाकडाच्या भुशामुळे शेतीला आवश्यक ते मुलद्रव्ये मिळतातंच पण गवताच्या अच्छादनामुळे शेतीची धूप थांबते, शेतीला पाणीही कमी लागते आणि तणही होत नाही. कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केला जात नसल्याने इथे जैवविविधता पाहायला मिळते. जवळपास ४० पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आणि नाना प्रकारच्या सापांचा वावर या शेतात आहे.

मियावाकी आणि Syntropic शेतीचा एक यशस्वी प्रयोग आहे हा. बांबू, साग, ऑस्ट्रेलियन साग, निलगिरी, आंबा, करंज, वड, पिंपळ, अर्जुन, केळी, अननस, फणस, पपई, फुलझाडे, शेवरी, बाभूळ अशी जवळपास २४० प्रकारचे झाडं इथे आहेत. झाडांच्या वाढीसाठी केली जाणारी कटिंग आणि सपोर्ट प्लॅटिंगचं तंत्र वाखाणण्याजोगं आहे. एवढी झाडे असतानाही प्रत्येक झाडाकडे कामगारांचं लक्ष असतं हे विशेष.

या ठिकाणी रोज २६ लोकं काम करतात. वेळेवर कामावर येणे आणि वेळेवर जाणे हा इथला नियम. ५ मिनीटेही लेट झालेलं जॉन आणि अंजी यांना चालत नाही. प्रत्येक कामगाराकडे एक वॉकीटॉकी दिलेला आहे. शेतात कुठेही असलेल्या कामगाराला देण्यात येणाऱ्या सूचना आणि एका क्षणात होणारं काम पाहून डोकं सुन्न होतं.

त्यांच्या शेती प्रकल्पासाठी तयार केलेले तळे आणि बंधारा
काम्बाफार्ममध्ये कार्यरत असलेल्या शोभाताई

या दाम्पत्याने आत्तापर्यंत या प्रयोगासाठी कोट्यावधी रूपये खर्च केलाय. जॉन शेतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम बघतात आणि अंजी या झाडांची लागवड आणि वाढीचं नियोजन सांभाळतात. हे दोघं एवढे ध्येयवेडे आहेत की जॉन हे एक दिवससुद्धा आपली शेती सोडून बाहेर जात नाहीत. या सात एकरात एवढे प्रयोग करूनही त्यांनी अजून ३ एकर जमीन भाड्याने घेतलीय. यामध्येही ते हाच प्रयोग राबवणार आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये स्थानिक शेतकरी आडकाठी आणतात पण मी थांबणार नाही असं ते सांगतात. त्यांना इथे परवानगी मिळवण्यासाठी सर्वाधिक खर्च आल्याचं ते सांगतात. एवढं करूनही त्यांचा भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी संघर्ष अजूनही सुरूच आहे.

हे शेतीतलं काटेकोरपणे नियोजन आणि पारंपारिक शेती करण्याच्या प्रवाहात एक आधुनिकता आणि वेगळ्या प्रयोगाची झालर घातलेला शेतीचा यशस्वी प्रयोग प्रत्येकाने (शेतीमध्ये आवड नसणाऱ्यानेही) पाहायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT