Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : विधानसभा जिंकण्यासाठी तयार रहा! राज ठाकरेंनी घेतला पश्‍चिम महाराष्ट्राचा आढावा

राज्यातील राजकीय स्थिती विचित्र असून, मतदारांना सत्ताधारी आणि विरोधकांचाही कंटाळा आला आहे. त्यामुळे मनसे हा योग्य पर्याय असणार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील राजकीय स्थिती विचित्र असून, मतदारांना सत्ताधारी आणि विरोधकांचाही कंटाळा आला आहे. त्यामुळे मनसे हा योग्य पर्याय असणार आहे. त्यामुळे ही विधानसभा जिंकण्यासाठी तयार रहा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत सर्वच राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला आहे. पुणे दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पश्‍चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

यामध्ये पुणे शहर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यानिहाय राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

मनेसेचे नेते शिरीष सावंत, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, अविनाश जाधव, अभिजित पानसे, सरचिटणीस हेमंत संभूस, बाळा शेडगे, अजय शिंदे, किशोर शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, योगेश खौरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील जनता केवळ सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या युती आणि आघाडीतील राजकारणाला कंटाळली आहे. त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. अशा काळात मनसे हा योग्य पर्याय मतदारांपुढे असणार आहे. विधानसभेची लढाई लढताना तुमची भूमिका महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे तयारीला लागा, मतदारांपर्यंत पोचा. योग्य वेळी उमेदवार जाहीर केले जातील, सर्वजण एकदिलाने काम करा अशी सूचना यावेळी राज ठाकरे यांनी दिली.

शिवसेना, भाजपच्या जागा वाटपानुसार रणनीती

मनसेतर्फे राज्यभरात सुमारे २२५ ठिकाणी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी राज ठाकरे यांचे महाराष्ट्रभर दौरेही झाले आहेत. काही ठिकाणचे उमेदवार ही त्यांनी जाहीर केले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात विधानसभेचे ७० मतदारसंघ आहेत. त्यातील शहरी मतदारसंघांमध्ये मनसेसाठी पोषक वातावरण आहे.

त्यामुळे तेथे उमेदवार उभे केले जातील, पण त्यांची संख्या आत्ताच स्पष्ट करता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना आणि भाजपला कोणत्या जागा सुटणार आहेत, त्यावरूनही ठाकरे यांची रणनीती ठरणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT