मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी हे होर्डिंग उभारणाऱ्या इगो मीडियाची माजी संचालक जान्हवी मराठे हिला मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीनं अटक केली आहे. गोव्यातून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यापासून पोलीस तिच्या मागावर होते. (Ghatkopar hoarding incident Ex Director of Ego Media Janhavi Marathe arrested from Goa)
एसआयटीनं जान्हवीसह कंत्राटदार सागर कुंभारला देखील अटक केली आहे. या दोघांना गोव्यातूनच ताब्यात घेण्यात आलं आहे. दुर्घटनाग्रस्त होर्डिंग उभारण्याच कंत्राट सागरनं घेतल्याचा गुन्हे शाखेचा दावा आहे. उद्या या दोघा आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता यामध्ये ७४ जण जखमी झाले होते. जान्हवी मराठे डिसेंबर २०२३ पर्यंत इगो मिडियाची संचालक म्हणून काम पाहत होती. तिच्याच काळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेल होर्डिंग उभारण्यात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.