Girl Beating Conductor ESakal
महाराष्ट्र बातम्या

Viral Video: चालत्या बसमध्ये विनयभंग; मुलींनी गाडी थांबवली अन्... कंडक्टर शिकवला धडा, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vrushal Karmarkar

Girl Beating Conductor: रत्नागिरीमध्ये दोन विद्यार्थिनी बस कंडक्टरला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुली रस्त्याच्या मधोमध बस कंडक्टरला चप्पलने मारहाण करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. बस कंडक्टरने चालत्या बसमध्ये मुलींचा विनयभंग केला. त्यानंतर मुलींनी बस थांबवली आणि सर्वांसमोरच कंडक्टरला जाब विचारला. तसेच त्याला चप्पलेने मारत अद्दल घडवली आहे, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

कोळथरे-दापोली-रत्नागिरी एसटी बसमध्ये पंचनदी येथील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनी बसमध्ये प्रवास करत असताना ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. बस कंडक्टरने बसमधील मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यावर धाडसी तरुणीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत बस थांबवली. त्यानंतर बस कंडक्टरला खाली उतरवून चप्पलने मारहाण केली. व्हायरल झालेला व्हिडिओ महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

घटनेची नेमकी वेळ आणि तारीख अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाच्या संबंधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त कळले नाही. बसमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी मुलींनी बस कंडक्टरला चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सोशल मीडिया वापरकर्त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि म्हटले की, "महाराष्ट्रातील पंचनदी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा कोळथरे-दापोली-रत्नागिरी एसटी बसमध्ये एका कंडक्टरने विनयभंग केला. मुलीने कंडक्टरला तिच्या चप्पलने जोरदार चापट मारली @msrtcofficial is विकृत मानसिकतेच्या या कंडक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT