सोलापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस. sakal
महाराष्ट्र बातम्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी गूडन्यूज! सेविका व मदतनिस कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅज्युइटी; तोपर्यंत मदतनिसांना ७५००० तर सेविकेला एकरकमी एक लाख रुपये

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर एकरकमी लाभ दिला जातो. १ एप्रिल २०२२ पासूनच्या प्रलंबित प्रस्तावांसाठी शासनाने नुकताच निधी मंजूर केला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर एकरकमी लाभ दिला जातो. १ एप्रिल २०२२ पासूनच्या प्रलंबित प्रस्तावांसाठी शासनाने नुकताच निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील २४७ सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. १ एप्रिल २०२२पासून ४७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर ५८ जणांनी राजीनामा दिला आहे. १४२ सेविका व मदतनीस सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या सर्वांना आता एकरकमी लाभ मिळेल. निवृत्ती किंवा मृत्यू झालेल्या मदतनीस कर्मचाऱ्यास ७५ हजार रुपयांचा एकरकमी तर सेविकांना एक लाख रुपयांचा लाभ मिळतो. पण, पाच वर्षे सेवा झाल्याशिवाय राजीनामा मंजूर केला जात नाही आणि त्यापूर्वी राजीनामा दिल्यास एकरकमीचा लाभ देखील मिळत नाही.

पाच वर्षे सेवा झालेल्या सेविका किंवा मदतनीस कर्मचाऱ्यास दरवर्षी पाच हजार रुपयांप्रमाणे एकरकमीचा लाभ मिळतो. दरम्यान, सरकारकडून अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युइटी देण्याचा निर्णय झाल्यावर हा एकरकमीचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असून त्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात ठराविक रक्कम मिळेल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

ग्रॅज्युइटी लागू झाल्यावर एकरकमीचा लाभ बंद

अंगणवाड्यांमधील सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी लागू करण्याबाबत शासनाने स्वतंत्र कमिटी नेमली आहे. या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार त्यासंदर्भातील अंतिम निर्णय घेणार आहे. त्यावेळी घेण्यात येणाऱ्या धोरणात्मक निर्णयाचा शासन निर्णय झाल्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर, राजीनामा दिल्यावर, मृत्यू झाल्यावर किंवा सेवेतून काढून टाकल्यावर एकरकमी लाभ बंद होणार आहे.

जिल्ह्यातील २४७ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार एकरकमी लाभ

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना शासनाकडून ग्रॅज्युइटी देण्यासंदर्भातील निर्णय होणार आहे. तोपर्यंत अंगणवाड्यांमधील निवृत्त झालेल्या किंवा मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळेल. १ एप्रिल २०२२ नंतरच्या आमच्याकडील २४७ कर्मचाऱ्यांना काही दिवसात एकरकमी लाभ वितरित होईल.

- प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT