Majhi Ladki Bahin Yojana scheme solapur
महाराष्ट्र बातम्या

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 29 सप्टेंबरला जमा होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे; ‘या’ महिलांना मिळणार नाही लाभ

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार महिलांच्या बॅंक खात्याला आधारलिंक नाही. त्यांनी आता बॅंक खात्याशी आधारलिंक न केल्यास त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. २९ सप्टेंबरपूर्वी संबंधित बॅंकेत जाऊन त्या अर्जदार महिलांना खात्याला आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील साडेदहा लाख महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील अंदाजे तीन ते साडेतीन लाख महिलांना अद्याप काहीच लाभ मिळालेला नाही तर उर्वरित महिलांना आता सप्टेंबरचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. दोन्ही प्रकारातील लाभार्थी महिलांना २९ सप्टेंबरला लाभ मिळेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसह राज्य सरकारच्या विविध योजनांचे सुमारे ४० हजार लाभार्थींना आणून शहरातील होम मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत वचनपूर्ती सोहळा होणार आहे. आतापर्यंत चारवेळा या कार्यक्रमाचे नियोजन झाले, दोनदा कार्यक्रमाची तारीखही निश्चित झाली, मात्र अद्याप तो सोहळा झालेला नाही. प्रशासनाकडेही हा कार्यक्रम कधी होणार, यासंदर्भात ठोस माहिती नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता कार्यक्रम राहू द्या, दरमहा एका फिक्स तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम बॅंक खात्यात जमा करावी, अशी मागणी सर्व लाभार्थी करीत आहेत. योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत योजनेसाठी अर्ज केलेला नाही, अशा पात्र महिलांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आधारलिंक नसलेल्यांनी बॅंकेत जावून आधारसिडिंग करून घ्यावे

सोलापूर जिल्ह्यातील सुमारे साडेदहा लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यातील एक लाख ३६ हजार महिलांच्या बॅंक खात्याला आधारलिंक नाही. त्यांनी आधारलिंक केल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही. आता पुढील लाभाची रक्कम २९ सप्टेंबरला वितरीत होणार आहे.

- प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

‘इतक्या’ महिलांच्या बॅंक खात्याला आधारलिंक नाही

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार महिलांच्या बॅंक खात्याला आधारलिंक नाही. त्यांनी आता बॅंक खात्याशी आधारलिंक न केल्यास त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. २९ सप्टेंबरपूर्वी संबंधित बॅंकेत जाऊन त्या अर्जदार महिलांना खात्याला आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे. त्यांची यादी राज्यस्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. ज्यांनी योजनेच्या सुरवातीला अर्ज केला, पण अद्याप लाभ मिळाला नाही, अशा त्या महिला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT