Gunthewari Scheme 50 percent Discount Esakal
महाराष्ट्र बातम्या

गुंठेवारीला मिळणार परवानगी, पण ‘या’ 2 कागदपत्रांचे बंधन! मोजणीची भूमिअभिलेख कार्यालयाची तयारी, पण महापालिकेकडून प्राथमिक ले-आऊट जरूरी

गुंठेवारीला परवानगी बंद असल्याने अनेकांनी नोटरी करून जागा घेतल्या, पण त्यांना त्याची मालकी मिळत नाही. तरीपण, ज्या जागा मालकाकडे त्या जागेचा मोजणी नकाशा व जागेची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे आहेत, त्यांना गुंठेवारीची परवानगी देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहराची लोकसंख्या १२ लाखांवर पोचली असून शहरात दाटी होत असल्याने अनेकजण हद्दवाढमध्ये राहायला जात आहेत. मात्र, गुंठेवारीला परवानगी बंद असल्याने अनेकांनी नोटरी करून जागा घेतल्या, पण त्यांना त्याची मालकी मिळत नाही. तरीपण, ज्या जागा मालकाकडे त्या जागेचा मोजणी नकाशा व जागेची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे आहेत, त्यांना गुंठेवारीची परवानगी देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे.

शहरातील ज्या मिळकतदारांनी पूर्वी गुंठेवारीची परवानगी घेतली आहे, त्यांना जागेची कागदपत्रे पाहून महापालिकेकडून बांधकाम परवानगी दिली जात आहे. पण, नव्याने गुंठेवारीसाठी अर्ज करणाऱ्यांना परवानगी दिली जात नाही. महापालिकेकडून त्या अर्जदारास मोजणी नकाशा व मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे मागितली जात आहेत. त्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून त्याचा नकाशा मागितला जातो.

मात्र, अर्जदार व्यक्तीची जागा त्याच ठिकाणी आहे हे महापालिकेच्या प्राथमिक ले-आऊटवरून सिद्ध होणार असल्याने भूमिअभिलेख कार्यालय त्या अर्जदारास महापालिकेकडील तात्पुरते मंजूर केलेले प्राथमिक ले-आऊट मागत आहे. दोन्ही कार्यालये एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने अद्याप गुंठेवारीचा प्रश्न निकाली निघालेला नाही.

दरम्यान, भूमिअभिलेख कार्यालयाच्या पत्रानुसार महापालिकेने ज्यांना ऑनलाइन परवाने दिले आहेत त्यांची माहिती पेनड्राईव्हमध्ये तर ऑफलाइन परवाने दिलेल्यांची माहिती हार्ड कॉपीमध्ये देण्याची तयारी दर्शविली आहे. पण त्यासाठी लागणारे स्कॅनिंगचे शुल्क ‘भूमिअभिलेख’ने द्यावे अशी महापालिकेची भूमिका आहे. आता दोन्ही कार्यालयातील पत्रव्यवहार कधी थांबणार व गरजूंना गुंठेवारीस परवानगी कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुंठेवारी मोजणीसाठी महापालिकेचे प्राथमिक ले-आऊट जरूरी

सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील गुंठेवारीची मोजणी करण्यासाठी महापालिकेकडून संबंधित जागांचे प्राथमिक ले-आऊट मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सांगोला, पंढरपूरसह पुणे जिल्ह्यात कशा पद्धतीने गुंठेवारीला परवानगी देण्यात आली आणि मोजणी करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली, याचीही उदाहरणे पत्रासोबत महापालिकेला दिली आहेत. मोजणी करायच्या जागांचे प्राथमिक ले-आऊट झालेली कागदपत्रे मिळाल्याशिवाय त्याची मोजणी कठीण आहे. त्यासंदर्भात काही दिवसांत बैठक घेतली जाईल.

- दादासाहेब घोडके, अधीक्षक, भूमिअभिलेख कार्यालय, सोलापूर

एकाच जागेची अनेकांना विक्री

शहराच्या हद्दवाढ भागातील अनेक मोकळ्या जागांची विक्री १०० किंवा ५०० रुपयांच्या बॉण्डवर करण्यात आली असून काहींनी त्यासंदर्भातील नोटरी देखील केलेली आहे. मात्र, त्याचे रेकॉर्ड कोठेही नसल्याने त्याच जागेची विक्री पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे जागेची मोजणी होत नाही आणि हद्द-खुणा व मालकी पण सिद्ध होत नाही, अशी स्थिती असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. तरीपण, हद्दवाढमध्ये शहराचा विस्तार होतोय, हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT