SAKAL Exclusive esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरकरांसाठी खुशखबर! समांतर जलवाहिनीची 15 नोव्हेंबरदरम्यान ट्रायल; सोलापूरकरांना मिळणार 2 व 3 दिवसाआड पाणी; दर बुधवारी राहणार सुटी

दहा ते बारा वर्षांपासूनची नियमित तथा दोन दिवसाआड पाण्याची सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आले असून १५ नोव्हेंबरदरम्यान ट्रायल होणार आहे. त्यानंतर सोलापूरकरांना आठवड्यातून दोनदा पाणी मिळणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दहा ते बारा वर्षांपासूनची नियमित तथा दोन दिवसाआड पाण्याची सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून १५ नोव्हेंबर दरम्यान त्याची ट्रायल होणार आहे. त्यानंतर सोलापूरकरांना आठवड्यातून दोनदा (दोन व तीन दिवसाआड) पाणी मिळणार आहे. सोलापूरकरांची सध्याची गरज २७० एमएलडी आहे, पण सध्या १८० एमएलडीपर्यंतच पाणी मिळते. आता समांतर जलवाहिनीमुळे दररोज २७० एमएलडीची गरज पूर्ण होणार आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या पाठपुराव्यातून सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्या नेतृत्वात सोलापूर ते उजनी धरणापर्यंत समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. १ जून २०२३ ते ४ जुलै २०२४ या काळात जलवाहिनीचे ९२ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. प्रभारी असतानाही श्री. चौबे यांनी कौतुकास्पद काम केले आहे. जलवाहिनीच्या कामाची मुदत नोव्हेंबरपर्यंत असून मुदतीपूर्वीच काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा, नळाला इलेक्ट्रिक मोटारी लावण्याचा प्रकार कायमचा बंद व्हावा, यादृष्टीने महापालिका आयुक्तांचे नियोजन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाणीपुरवठ्याचे संभाव्य नियोजन

  • जुन्या लाइनचे ८० एमएलडी, नवीन लाइनचे १७० एमएलडी आणि हिप्परग्यावरील लाइनचे २० एमएलडी, असे २७० एमएलडी पाणी मिळेल

  • अडीच तास पाणी सुटणार, जेवढे गावठाण भागाला तेवढेच हद्दवाढ भागाला पाणी मिळणार आहे.

  • नदीतून आलेले पाणी फिल्टर जास्त करावे लागते, थेट उजनीतून सोरेगाव येथे पाणी आणून त्याठिकाणी फिल्टर केले जाणार आहे.

  • सध्या रात्री १२ पर्यंत व पहाटे चारपासून पाणी सोडले जाते, पण नोव्हेंबरनंतर रात्री आठ-साडेआठपर्यंत व पहाटे पाचपासून सुटेल पाणी

  • धरणात १८ मीटर खोलवर स्लॅब टाकून पाणी उपसण्याचे पंप बसविले जात असल्याने धरण उणे ६५ टक्के झाले तरीही पाणीपुरवठा सुरळीत राहणार

१८०० मीटर भूसंपादनाचा प्रस्ताव उपजिल्हाधिकाऱ्यांकडे

टेंभुर्णी बायपासजवळ राष्ट्रीय महामार्गाची जागा नसल्याने समांतर जलवाहिनीसाठी त्याठिकाणी १८०० मीटरपर्यंत खासगी जागा घ्यावी लागणार आहे. त्या जागेचे मूल्यांकन, रेडीरेकनर दर व अंदाजे किती रुपये जमीन मालकांना द्यावी लागेल, याचा अहवाल देण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ७ यांच्याकडे दिला आहे. वन विभागाकडूनही काही दिवसांत कामाला परवानगी मिळणार असून सप्टेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

‘अमृत-२’नंतर शहराला दररोज पाणीपुरवठा

सोलापूर महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा बंद होऊन आता २२ ते २५ वर्षे झाली आहेत. विस्तारलेल्या शहराला अमृत-२ योजनेअंतर्गत ८९२ कोटींचा निधी हवा आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सादर केला आहे. त्यातून २३ नवीन टाक्या बांधणे, शहरातील विशेषत: हद्दवाढमधील चार- सहा इंची पाइपलाइन बदलून त्याठिकाणी नवीन कामे होणार आहेत. त्यामुळे शहराला दररोज पाणी मिळेल, पण त्यासाठी योजनेतून निधी मिळेपर्यंत वाटच पाहावी लागणार आहे.

१५ नोव्हेंबर दरम्यान समांतर जलवाहिनीची ट्रायल

समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून १५ नोव्हेंबरदरम्यान ट्रायल घेण्याचे नियोजित आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला आठवड्यात दोनदा म्हणजे एकदा दोन दिवसाड तर एकदा तीन दिवसाआड पाणी मिळेल.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका

शहराच्या पाण्याची स्थिती

  • अंदाजे लोकसंख्या

  • १२ लाख

  • दररोज पाण्याची गरज

  • २७० एमएलडी

  • सध्याचे दररोजचे पाणी

  • १८० एमएलडी

  • ‘समांतर’मधून मिळणारे पाणी

  • १७० एमएलडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT