ST Bus esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीत धावणार लांबपल्ल्याच्या दररोज ५०० बसगाड्या; आजपासून १८ नोव्हेंबरपर्यंत विशेष गाड्या; सहा दिवसांचे १.१४ लाख प्रवाशांचे बुकिंग

शाळांना रविवारपासून दिवाळी सुट्या लागणार असून दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरपासून पुन्हा शाळा सुरु होतील. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने दिवाळीसाठी २६ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या २५ दिवसांसाठी दररोज लांबपल्ल्याच्या ५०० गाड्या धावणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : शाळांना रविवारपासून (ता. २७) दिवाळी सुट्या लागणार असून दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरपासून पुन्हा शाळा सुरु होतील. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने दिवाळीसाठी २६ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या २५ दिवसांसाठी दररोज लांबपल्ल्याच्या ५०० गाड्या धावणार आहेत.

यंदा दिवाळी गर्दीच्या हंगामात एसटीची भाडेवाढ होणार नसल्याने एसटीचा प्रवास पूर्वीच्याच दराप्रमाणे करता येणार आहे. तसेच ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत व ज्येष्ठांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. दिवाळीसाठी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नागपूर, मुंबई, नाशिक या विभागांसाठी विशेष नियोजन केले आहे. याशिवाय स्थानिक प्रवाशांच्या मागणीनुसार देखील ज्यादा बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.

एसटी महामंडळाने दिवाळीसाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता, पण तो मागे घेण्यात आल्याने प्रवाशांना माफक दरात लालपरीतून सुरक्षित प्रवास करता येणार आहे. दररोज ५०० गाड्यांप्रमाणे २६ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत दररोज ५०० प्रमाणे २५ दिवसांत साडेबारा हजार बसगाड्या राज्यातील २००हून अधिक लांबपल्ल्याच्या मार्गांवर प्रवाशांची सेवा करणार आहे.

२६ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सव्वालाख प्रवाशांचे बुकिंग

दिवाळीसाठी महामंडळाने सुरु केलेल्या विशेष बसगाड्यांचे प्रवाशांना ऑनलाइन बुकिंग देखील करता येणार आहे. २६ ते ३१ ऑक्टोबर या काळात महामंडळाच्या बसगाड्यांमधून लांबचा प्रवास करण्यासाठी तब्बल एक लाख १५ हजार प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंग केले आहे. २६ ऑक्टोबरला २६ हजार ६३१ तर २७ नोव्हेंबरला २० हजार ४४७ प्रवाशांनी, २८ ऑक्टोबरसाठी दहा हजार ८०० तर २९ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ४१ हजार एक प्रवाशांनी बुकिंग केले आहे.

दररोजच्या विशेष गाड्यांचे नियोजन

  • विभाग बसगाड्या

  • पुणे १२२

  • छ.संभाजी नगर ११४

  • नाशिक ८५

  • मुंबई १५२

  • अमरावती २३

  • नागपूर ०४

  • एकूण ५००

स्वस्त, सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी एसटीच भारी

दीपावलीनिमित्त आपल्या आप्तेष्टांना भेटायला उत्सुक असलेल्या सर्व प्रवासी बंधू-भगिनींना एसटी महामंडळाकडून सुरक्षित व सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा. आमचे चालक, वाहक व इतर कर्मचारी आपल्या सुखरूप प्रवासासाठी अहोरात्र काम करत आहेत. स्वत:च्या कुटुंबासोबतचा सण सोडून सर्व कर्मचारी प्रवासी वाहतुकीसाठी तत्पर सेवा देत आहेत. प्रवाशांनी देखील अवैध वाहतूकीऐवजी स्वस्त, सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी एसटीचाच वापर करावा.

- अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT