'कोतवालच कसाई झाले पारधी समाजानं न्याय मागायचा तरी कुणाकडं?'
मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गढूळ झालं आहे. दरम्यान, राजकीय कारणांमुळं महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आता पुन्हा एकदा भाजपाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरलं आहे. पारधी सामजाशी संबंधित एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी ही घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी असल्याची सणसणीत टीका केली आहे.
ट्विटमध्ये पडळकर म्हणतात, पारधी समाजाच्या माजी सरपंचासकट 60 कुटुंबावर गाव सोडून जंगलात जाण्याची वेळ आली. यवतमाळच्या माळवागद गावातली ही घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी आहे. बहुजन आदिवासींवर एवढा आकस कशाचा? पारधी महिलांवर अत्याचार झाले. वारंवार तक्रारी केल्या तरी कारवाई नाही. पिढ्यानं पिढ्या उध्वस्त झाल्या. कोतवालच कसाई झाले पारधी समाजानं न्याय मागायचा तरी कुणाकडं?, असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (AhilyaDevi Holkar) स्मारकाचे लोकार्पण सोहळ्यावरून वाद निर्माण झाला. या घटनेमुळे सांगलीत काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी गनिमी काव्याने स्मारक परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. त्यामुळे त्यांनी 'ड्रोन' कॅमेऱ्याद्वारे स्मारकावर पुष्पवृष्टी करून लोकार्पण केले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.