राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल विधीमंडळात धक्कादायक असे गौप्यस्फोट केले आहेत. आज नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने आझाद मैदानात मोर्चा काढला आहे. महाविकास आघाडीवर भाजपने टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडीवर (MahaVikas Aghadi) निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस नावाने सत्ताधाऱ्यांचा थरकाप उडाला आहे. आता गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं असा इशारा पडळकरांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस नावाने सत्ताधाऱ्यांचा थरकाप उडाला आहे. आता गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं
काय म्हणाले अधिवेशनात पडळकर
पुणे जिल्ह्यामधील बारामती शहरातील एक पोलिस एका तरूणीला घेऊन लाॅजवरती जातो. लाॅजवरती गेल्यानंतर ती मुलगी चित्रीकरण करते. त्यानंतर ते चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होत. यानंतर येथील लोकप्रतिनिधी तडकाफडकी बदली करतात. मात्र त्याच्यावर गुन्हा नोंद का केला जात नाही. कोण त्यांना पाठीशी घालतय याचा खुलासा गृहमंत्रालयाने महाराष्ट्रातील जनतेला देणे बंधनकारक आहे अशी टीका भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली.
कायदा सुव्यवस्थे विषयी बोलताना पडळकर म्हणाले, तहसील कार्यालयातील प्रकरणामुळे लक्षात येते आहे की, कायदा सुव्यवस्था किती बिघडलीय बघा. तहसीलदार कार्यालयात एक व्यक्ती येतो टेबलवर असलेल्या तरूणीचे चुंबन घेतो आणि पळून जातो. ती महिला शिव्या देत आत जाते. सीसीटीव्ही फुटेज मिळते पण तो व्यक्ती सापडत नाही. महिलांसाच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.