Bhagat-singh-Koshyari-Cm-Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे भूमिका स्पष्ट करायला हवी - हायकोर्ट

सकाळ डिजिटल टीम

12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. यावेळी हायकोर्टाने राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे असं मुंबई उच्च न्यायालायने म्हटलं आहे.

राज्याचा कारभार जबाबदारीने पार पडण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी समन्वयाने काम करायला हवे. विधान परिषद आमदार नियुक्तीमध्ये राज्यपालांना विशेष अधिकार असले तरी ते या जागा अनिश्चित कालावधीसाठी रिक्त ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी विशिष्ट कालावधीत आपली भूमिका मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट करायला हवी, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे आता तरी विधान परिषद आमदारांबाबत राज्यपाल निर्णय घेणार का हे पाहणे रंजक ठरेल.

न्यायालय राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही. त्यामुळे याचिकेत त्यांना किंवा राज्यपाल सचिवांना प्रतिवादी केले नाही. परंतु बारा आमदार नियुक्ती ही देखील घटनात्मक तरतूद आहे आणि त्यांच्या काम करण्याच्या अधिकारात देखील बाधा येऊ नये. यामुळे या नियुक्तिचे चित्र स्पष्ट व्हायला हवे. राज्यात प्रगल्भ, संवेदनशील आणि जबाबदार कारभार होण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी एकमेकांशी समन्वय साधायला हवा. यामध्ये मतभेद असले तरी त्याचे पडसाद कामावर होता कामा नये हेदेखील पाहायला हवे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी राज्यपालांनी अवधी निश्चित करायला हवा, असेही खंडपीठाने सुचविले.

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रश्नावर न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकांवर आज मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने निकालपत्र जाहीर केले. नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते रतन सोली यांनी एड एस्पी चिनौय यांच्यामार्फत ही याचिका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये बारा आमदारांच्या नावांची मंत्रीमंडळाने समंत केलेली यादी राज्यपालांना दिली आहे. आठ महिने उलटून गेले तरी राज्यपालांनी यावर निर्णय दिलेला नाही. कायद्यानुसार जूनमध्ये ही नियुक्ती व्हायला हवी होती. मात्र तेरा महिने झाले आहेत असा युक्तिवाद राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. तर राज्यपालांनी कोणताही निर्णय घ्यावा, मात्र प्रकरण असेच ठेऊ नये, अशी मागणी याचिकादाराने केली होती.

राज्यपालांना ज्याप्रमाणे अधिकार आहेत त्याचप्रमाणे जबाबदारीही राज्य घटनेने दिली आहे. अशा परिस्थितीत ते विधान परिषदेतील बारा आमदारांच्या जागांंवर निर्णय न घेता ती पदे रिक्त ठेऊ शकतात का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. दरम्यान, मंत्रीमंडळाचा निर्णय राज्यपालांना बांधिल नाही, असा दावा केंद्र सरकारने केला. तर आम्ही यादी देऊन आठ महिने झाले पण राज्यपालांकडून काहीही प्रतिसाद नाही, असा युक्तिवाद राज्य सरकारने केला होता. अभिनेत्री, उर्मिला मातोंडकर, नितीन पाटील, एकनाथ खडसे आदी बारा जणांची यादी मंत्रीमंडळाने समंत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT