कोल्हापूर : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी महाविकास आघाडीवर आज जोरदार टीका केली आहे. तसेच या आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीच्या सगळ्या कारणांची यादी पूर्ण केली असल्याची खोचक टीका देखील त्यांनी आज केली आहे. राज्यात सुरु असणार पेपर फुटीच्या सत्रावरुन टीका करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील? चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद (Chandrakant Patil Press) घेतली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, "गेल्या काही दिवसांत एक-दोन नव्हे तर तब्बल तीन परीक्षांचे पेपर फुटले आहेत. या सगळ्याची पाळंमुळं राजकीय व्यक्तींपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळेच आम्ही सीबीआय चौकशीची मागणी लावून धरणार आहे. राज्यपालांनी एखादा निरोप पाठवला तरी हे सरकार ते नाकारत आहे म्हणजे हे सरकार राज्यपालांचाही अपमान करतंय. या सरकारची राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीची सगळी यादी पूर्ण झाली आहे. सगळी कारणं यांनी पूर्ण केली आहेत. पुढे त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलंय की, "जे कुणी त्रासदायक ठरतील त्या व्यक्ती यांना नको आहे. तपास यंत्रणा आणि भाजपचा कोणताही संबध नाही. राज्यात सगळा गोंधळच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला आव्हान देताना त्यांनी म्हटलंय की, पुन्हा एकदा जनतेसमोर जा मग कळेल जनता कुणाला स्वीकारते?" असं खुलं आव्हान देखील चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिलं आहे.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, "गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत संपादक, संजय राऊत प्रवक्ते, संजय राऊत हेच सरकारचे प्रवक्ते... हेच पाहायला मिळत आहे. इतर सगळ्यांनाच बाजूला करण्यात आलंय. त्यामुळेच सेनेतील घुसमट बाहेर पडतीये. आता माझ्या या बोलण्यावरूनही उद्या सामनामधून टीका होणार यात शंका नाही." अशी कोपरखळीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.