sharad pawar 
महाराष्ट्र बातम्या

मागच्या वर्षी 1 हजार, पण यंदा 10 हजार टँकर, सरकारचं दुष्काळाकडे लक्ष नाही; शरद पवारांची टीका

Sharad Pawar on Drought Situation: शरद पवार यांनी आज दुष्काळी स्थितीवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

कार्तिक पुजारी

मुंबई- शरद पवार यांनी आज दुष्काळी स्थितीवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे चिंताजनक स्थिती आहे.. आपल्याकडे सर्वात जास्त धरणे आहेत. पण, या धरणाची अवस्था अत्यंत वाईट आहे. संभाजीनगरमध्ये १० टक्के पाणी आहे. पुणे विभागात ३५ धरणं आहेत तिथे १६ टक्के पाणीसाठा आहे. नाशिकमध्ये २२ धरणे आहेत तिथे २२ टक्के पाणी आहे. कोकणात २९ टक्के पाणी आहे, अशी माहिती पवारांनी दिली आहे.

उजनी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठी शून्य आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ५ टक्के पाठीसाठा आहे, माजलगावमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मांजरा धरणात अर्धा टक्का सुद्धा पाणी नाही. धाराशिव जिल्हात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अहमदनगरमध्ये ९ टक्के पाणीसाठा आहे, असं पवार म्हणाले.

मे महिन्याच्या शेवटाकडे आपण आहोत, पण जूलैपर्यंत हीच स्थिती असणार आहे. पाऊस पडतो, पण धरणं भरण्यासाठी वेळ लागतो. संभाजीनगरमध्ये १८६७ टँकर लागत आहेत. वेळीच लक्ष दिलं नाही तर स्थिती गंभीर होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यामध्ये ६३२ गाव आणि वाड्यामध्ये ७५५ टँकर सध्या लागत आहेत, असं पवार म्हणाले.

राज्यात यंदा १०, ५७२ टँकर लागत आहेत, मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते. यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. जनावरांच्या चाऱ्याची आवश्यकता आहे. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणं, किंवा रोजगार हमीचे कामं काढणं आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी सूचवलं आहे. राज्याची स्थिती गंभीर असून सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याची टीका पवारांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT