Maharashtra Corona Update Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

वाढत्या रुग्ण संख्येत महाराष्ट्रातील दाेन जिल्हे केंद्राच्या यादीत

दरम्यान पुणे , ठाणे, गाेंदिया, धुळे, आैरंगाबाद , भंडारा, मुंबई , नंदूरबार , नांदेड , लातूर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत रुग्ण संख्या घटली आहे.

सिद्धार्थ लाटकर

सातारा : गेल्या दाेन आठवड्यात देशातील काेराेनाबाधित रुग्णांच्या (Covid 19 Patients) वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) सातारा (Satara) आणि साेलापूर (Solapur)जिल्ह्याचा समावेश आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकराने जाहीर केली आहे. (government names 15 district increasing covid19 cases satara solapur maharashtra news)

रुग्ण संख्या वाढलेल्यांमध्ये कर्नाटक राज्यातील बंगळूर आणि म्हैसूर, तामिळनाडूतील चेन्नई, केरळमधील काेझीकाेडे , इर्नाकूलम, थ्रीसूर, मालापूरम, काेट्याम आणि आल्पाहूजा या जिल्ह्यांचा समावेश आहे. याबराेबरच हरियाणामधील गुरुग्राम, बिहरामधील पटना, आंध्रप्रदेशमधील चित्ताेड तसेच उत्तराखांमधील डेहराडून येथे देखील माेठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढलेली आहे.

महाराष्ट्रातील सातारा आणि साेलापूर या दाेन जिल्ह्यांत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना oxygen bed मिळावा यासाठी धावा धाव करावी लागत आहे.

सातारा जिल्ह्यात 13 ते 29 एप्रिल काळात आठ हजार 958 , 20 ते 26 एप्रिल काळात 12 हजार 194 तसेच 27 एप्रिल ते तीन मे काळात 15 हजार 328 रुग्णांची नाेंद झाली आहे. काेराेनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्हा दहा मे पर्यंत लाॅकडाउन केला आहे. जिल्ह्यात केवळ मेडिकलची दुकाने सुरु आहेत. अन्य सर्व व्यवहार बंद आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तु घरपाेच दिल्या जात आहेत.

साेलापूर जिल्ह्यात 13 ते 29 एप्रिल काळात आठ हजार 863 , 20 ते 26 एप्रिल काळात 11 हजार 401 तसेच 27 एप्रिल ते तीन मे काळात 13 हजार 864 रुग्णांची नाेंद झाली आहे.

दरम्यान पुणे , ठाणे, गाेंदिया, धुळे, आैरंगाबाद , भंडारा, मुंबई , नंदूरबार , नांदेड , लातूर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत रुग्ण संख्या घटली आहे.

government names 15 district increasing covid19 cases satara solapur maharashtra news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT