rajesh tope sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्याने कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाही : टोपे

विरोधकांच्या आरोपात तथ्य नसून, कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल.

निनाद कुलकर्णी

जालना : राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी लपविल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी उत्तर दिले आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर करण्यात येणाऱ्या आरोपांचे खंडन केले आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे (Death Due to Corona) मृत्यू झालेल्य़ांची कुठलीही आकडेवारी लपवलेली नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.

भारतात ओमिक्रॉन (Omicron Cases In India) रूग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्टातही ओमाक्रॉनचे (Omicron cases in maharashtra) 54 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. ते म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल. मात्र याबाबत घाबरून जाण्यासारखे काही नाही. आगामी नाताळ आणि नववर्षात नागरिकांनी गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केली आहे.

सध्या रोज साडेसहा लाख लोकांचे (Covid Vaccination) लसीकरण होत असून या गतीने लसीकरण झाल्यास 20 दिवसात लसीकरण पूर्ण होऊ शकेल, अशी माहितीही टोपे यांनी दिली. लस न घेतलेल्या लोकांची गाव निहाय यादी करून प्रत्येक व्यक्तीला मॅसेज पाठवण्यात येणार असल्याचे मंत्री टोपे यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT