मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यात वाद सुरु झाला आहे. अनेकांनी कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. काहींनी तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचे (Congress Party) प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा ट्विटवर समाचार घेतला आहे. लोंढे म्हणतात, राज्यपालांनी महाराष्ट्राचा विश्वास गमावलेला आहे. राष्ट्रपती महोदयांनी याची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. राज्यपालांचं वर्तन घटनात्मक पेचप्रसंगाकडे जाताना दिसतयं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुघल-इंग्रज, पोर्तुगीजांना पुसता आला नाही. (Governor Bhagat Singh Koshyari Lose Confidence Of Maharashtra, Said Atul Londhe)
संघी काय चीज आहे. महाराष्ट्र महाराजांच्या इतिहासाशी होत असलेली छेडछाड सहन करणार नाही. जय महाराष्ट्र, असे लोंढे म्हणाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असे आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथील समर्थ साहित्य परिषदेत रविवारी (ता.२७) केले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.