मुंबई : मार्च महिन्यापासून भारतावर कोरोनाचं संकट घोंगावतंय. अशात एक आशेचा किरण आता समोर येतोय. हा आशेचा किरण आहे कोरोनावर लवकरच येऊ घातलेली लस. भारतात पाच विविध लसींवर संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नसणार आहेत.
महत्त्वाची बातमी : "महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री आजवर पाहिले नव्हते"; सरकारवर फडणवीसांचा हल्लाबोल
राजशिष्टाचारानुसार एखाद्या राज्यात पंतप्रधान येतात तेंव्हा त्या राज्यातील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी जातात. मात्र आज पुण्यात पंतप्रधान येत असताना राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत. महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे देखील मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार नाहीत.
देशात कोरोनाचे सावट आहे. अशात सगळीकडे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातायत. कुणीही गर्दी न करण्याचे आवाहन केंद्राकडून आणि राज्याकडून वारंवार केलं जातंय. आजचा पंतप्रधानांचा दौरा अल्प काळाचा आहे. सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेट पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींच्या स्वागतासाठी कुणीही उपस्थित राहू नये अशा सूचना आल्याचं समजतंय. PMO ऑफिसकडून प्रशासनाला या सूचना प्राप्त झाल्यामुळे मोदींच्या स्वागतासाठी आज राज्यपाल किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत.
governor of maharashtra or maharashtra cm will not be present to welcome modi in pune
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.