Sandipan Bhumare Sakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्री संदीपान भुमरे फक्त 8 दिवस पालकमंत्री राहणार; माजी खासदाराचा मोठा गौप्यस्फोट | Chandrakant Khaire

दत्ता लवांडे

"कोण पालकमंत्री? मी उन्हात उभा आहे, सुर्याच्या साक्षीने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने सांगतो, संदीपान भुमरे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर लिहून घ्या" असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

नेते चंद्रकांत खैरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. त्याचे काय कारणं असतील ते तुम्ही शोधा पण ते फक्त आठ दिवसंच पालकमंत्री म्हणून राहणार आहेत असंही ते म्हणाले.

"मातोश्रीवर गेल्यावर महाविकास आघाडी भक्कम होईल असं मला वाटत नाही. त्यांनी ठोस काम दाखावावं, आघाडी भक्कम होण्यासाठी काम करावं लागतं. शिवसेना भाजप आघाडी ही भक्कम आहे त्यामुळे महाविकास आघाडीने कितीही नाटकं केले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. बाळासाहेब होते त्यावेळचा विषय वेगळा होता पण आता हेच मातोश्री सोडून दुसरीकडे जातात. त्यामुळे सध्या मातोश्रीवर कुणीही जाऊ शकतं." असं वक्तव्य मंत्री संदीपान भुमरे यांनी केलं आहे.

दरम्यान, पैठण येथील आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांच्यात आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. दोघेही एकमेकांवर आरोप प्रात्यारोप करत असून खैरे वारंवार वेगवेगळ्या प्रकारचा दावा करत असतात.

शिंदे गटातील काही आमदार माझ्या संपर्कात असून ते पुन्हा ठाकरे गटात येणार असल्याचा दावासुद्धा खैरे यांनी केला होता. त्यानंतर भुमरे हे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT