Graduate Vocational Education sakal
महाराष्ट्र बातम्या

Graduate Vocational Education : महाविद्यालयांमध्ये २५०० नवीन जागा;शंभरहून अधिक शैक्षणिक संस्थांना परवानगी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पदवीचे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींच्या शुल्काची १००  टक्के प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर राज्यातील शंभरहून अधिक संस्थांना अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, औषधनिर्माण, एमबीए, एमसीए आदी अभ्यासक्रमांच्या अडीच हजारांहून नवीन जागांना मान्यता दिली आहे.

गेल्‍या वर्षी अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, औषधनिर्माणच्या हजारो जागा रिक्त राहिलेल्या असताना आता पुन्हा अडीच हजारांहून अधिक जागांना मान्यता देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सरकारने व्यावसायिकच्या सर्वच अभ्यासक्रमांना शुल्क प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय घेतल्यानंतरच काही संस्थाचालकांना सरकारने खिरापत म्हणून या जागा वाढविण्यास मंजुरी दिली आहे का, असा सवाल मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब साळवे यांनी केला. दुसरीकडे सरकारकडून अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणार याची माहिती असल्यानेच काही संस्थांनी यापूर्वीच प्रस्ताव दाखल केल्याची माहिती मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT