no entry of corona 229 villages in Pune district  
महाराष्ट्र बातम्या

राज्याला मोठा दिलासा; दिवसभरात आढळला नाही ओमिक्रॉनचा रुग्ण

आज ६९९ नव्या रुग्णांची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात ओमिक्रॉन बाधित एकही रुग्ण आज सापडला नाही. त्यामुळं काहीसा दिलासा मिळाला आहे. आधी कल्याण-डोंबिवली नंतर मुंबईत ओमिक्रॉन बाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली होती. दरम्यान, राज्यात आज केवळ ६९९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

राज्यात कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूंची संख्या सोमवारच्या तुलनेत वाढली. मृतांचा आकडा ५ वरून १९ पर्यंत वाढला त्यामुळं कोरोना मृतांचा एकूण आकडा १,४१,१९४ इतका झाला आहे. औरंगाबाद, अकोला, नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे ४, नाशिक ४, पुणे ६, कोल्हापूर २ तर लातूरमध्ये ३ मृत्यू नोंदवले गेले. राज्यात आज ६९९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळं करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३९,९९५ झाली आहे.

राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन ६,४४५ इतकी आहे. आज १,०८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६४,८८,६८० इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९७.७२ टक्के एवढं झालं आहे. सध्या राज्यात ७७,६४२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT