महाराष्ट्र बातम्या

साहित्यनिर्मितीतील अद्वैतांना कृतज्ञतेचा नमस्कार

ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक शहाणे, हिंगलासपूरकर यांचा सत्‍कार

सकाळ वृत्तसेवा

कुसुमाग्रजनगरी : वाचनाचा आनंद घेणाऱ्या साहित्य निर्मितीतील अद्वैत कादंबरीकार मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सन्मान करून त्यांना साहित्य पंढरीतर्फे कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला. माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ४) हा सन्मान सोहळा झाला. लक्ष्मीबाई टिळक आणि कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्यामुळे लेखनाची प्रेरणा मिळाली, असा भाव श्री. शहाणे यांनी मांडला.

तर, ग्रंथ चळवळीत योगदान देणाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सन्मान स्वीकारत असल्याचे श्री. हिंगलासपूरकर यांनी अधोरेखित केले. मुख्य मंडपात झालेल्या या सोहळ्यासाठी महामंडळाचे कार्यवाह दादासाहेब गोरे, संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे, प्राचार्य प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. ग्रंथालीचे दिनकर गांगल हे वाचकांच्या समवेत बसले होते. लक्ष्मीबाई टिळक यांचा साहित्य प्रकटीकरणासाठी मनुष्य शोधण्याचा प्रयत्न माझ्या मनात खोलवर रुतून बसला. कुसुमाग्रजांनी लिहिण्याची ठिणगी टाकली, असे श्री. शहाणे यांनी सांगितले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. महामंडळाच्या लेखक आणि प्रकाशक यांच्या सन्मानविषयक उपक्रमाची माहिती श्री. ठाले-पाटील यांनी प्रास्ताविकामधून सांगितली. १९८० च्या दशकात मुंबईत ग्रंथालय चळवळ त्या वेळच्या तरुणांनी उभी केली. त्यांना विजय तेंडुलकर यांचे आशीर्वाद होते. त्यातून ग्रंथालीचे काम पुढे आल्याची माहिती त्यांनी दिली.

शहाणे यांना भुजबळांचा लवून नमस्कार

सन्माननंतर श्री. शहाणे यांनी छगन भुजबळ यांना जवळ बोलावून घेतले. कानात संवाद साधत असताना श्री. शहाणे हे श्री. भुजबळ यांच्या पाठीवरून हात फिरवत होते. संवाद संपताच श्री. भुजबळ यांनी श्री. शहाणे यांना लवून नमस्कार केला.

बुलडाण्याच्या कलाशिक्षकांचा संमेलनात अभिनव उपक्रम

प्रत्येक मराठी माणसाला मराठी बोलण्याबरोबरच मराठीत स्वाक्षरी करता आली पाहिजे. याच उद्देशाने बुलडाणा येथील कलाशिक्षक गोपाल वाकोडे आणि त्यांचे सहकारी अनिल पवार हे संमेलनात सहभागी साहित्यरसिकांना मराठीतून स्वाक्षरी करणे शिकवीत मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवीत आहेत. श्री. वाकोडे आणि पवार हे २००५ मध्ये नाशिकला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी झाले होते.

त्या वेळी वाकोडे यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेत स्वाक्षरी आलीच पाहिजे या उद्देशाने ‘मी मराठी, माझी मराठी स्वाक्षरी’ हा उपक्रम सुरू केला. तेव्हापासूनच ते दर वर्षी साहित्य संमेलनात हा उपक्रम राबवीत असून, प्रत्येकाला त्याच्या नावाच्या मराठीतील पाच स्वाक्षऱ्यांचे नमुने काढून देत मराठीतूनच स्वाक्षरी करण्याचे आवाहन करत असतात. यंदाच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी दोन दिवसांत जवळपास हजाराहून अधिक लोकांना त्यांच्या मराठीतील स्वाक्षऱ्यांचे प्रत्येकी पाच नमुने काढून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT