Park Stadium  esakal
महाराष्ट्र बातम्या

क्रिकेट सामन्यासाठीही ‘जीएसटी’! पार्क स्टेडिअमवर डिसेंबरमध्ये रणजी सामने; २८ वर्षांची प्रतीक्षा संपणार; ‘MCA’ अध्यक्षांची ग्वाही

२८ वर्षानंतर पहिल्यांदाच सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर डिसेंबरमध्ये रणजी सामने खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला तशी ग्वाही दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : २८ वर्षानंतर पहिल्यांदाच सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर डिसेंबरमध्ये रणजी सामने खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला तशी ग्वाही दिली आहे. आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे.

मुंबई, पुणे, नाशिकनंतर सोलापूर शहरातील पार्क स्टेडिअमवर आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या रणजी सामन्यातील काही सामने सोलापुरात होणार आहेत. पार्क स्टेडिअमवर जवळपास २२ ते २५ हजार प्रेक्षक बसू शकतात.

खेळाडूंची ड्रेसिंग रुम, सरावासाठी खेळपट्टी मुबलक असून मुख्य सामन्यांसाठी खेळपट्ट्या देखील उत्तम आहेत. काही दिवसांपूर्वी रणजी निवड चाचणीसाठी सामने या मैदानावर पार पडले. त्यावेळी रणजीचे २८ तर २३ वर्षांखालील संघाचे ३३ खेळाडू आणि सर्व संघाचे प्रशिक्षक सोलापुरात आले होते. त्यांना मैदानाबरोबरच मैदानावरील सोयी- सुविधा आणि सोलापुरातील राहण्याची सोय, जेवण खूपच आवडले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या माध्यमातून पार्क स्टेडिअमवर रणजी सामने होण्यासाठीही पाठपुरावा सुरु आहे. ३० वर्षांखालील, १९ वर्षांखालील व महिलांचे रणजी सामने होणार आहेत. त्यापैकी काही संघाचे रणजी सामने सोलापुरातील पार्क स्टेडिअमवर होणार आहेत.

क्रिकेट सामन्यासाठीही ‘जीएसटी’

स्मार्ट सिटीतून विकसित करण्यात आलेल्या भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवरील सामन्यांसाठी सध्या जीएसटीसह आठ हजार ४०० रुपयांचे भाडे द्यावे लागत आहे. मैदान विकसित करण्यापूर्वी अवघ्या ५०० रुपयांमध्ये त्याठिकाणी सामने खेळले जात होते. सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू राज्यात, देशात जावेत या हेतूने सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची तयारी आहे. त्यासाठी जास्तीत जास्त सामने होणे गरजेचे असून त्याकरिता मैदानासाठी द्यावे लागणारे भाडे कमी करावे, अशीही त्यांची मागणी आहे. परंतु, भरमसाट भाडे आणि त्यावर पुन्हा जीएसटी भरावा लागत असल्याने सामन्यांची संख्या कमी झाल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटप्रेमींनी महापालिका प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

यंदा रणजी सामने होणारच

सोलापूर शहरातील पार्क स्टेडिअमवर डिसेंबरमध्ये किमान दोन तरी रणजी सामने होतील, असा विश्वास आहे. २८ वर्षांनंतर सोलापूरला ही संधी मिळाली असून ‘एमसीए’चे अध्यक्ष रोहित पवार यांनीही तशी तयारी करण्याचे आम्हाला सांगितले आहे. सोलापूर शहरात राहण्याची, जेवणाची सोय व मैदानावरील सुविधा उत्तम असल्याने निश्चितपणे आपल्याला ही संधी मिळणार आहे.

- चंद्रकांत रेंबुर्से, सरचिटणीस, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT